shivsena ubt पोंभूर्णा :- तालुक्यातील गंगापूर गावातील अतिसार व पोटदुखीमुळे एका २१ वर्षीय युवकाचा मृत्यू झालाची घटना दि.१६ ऑगस्टला संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. सुरज काशीनाथ मंढरे वय (२१) रा.गंगापूर असे युवकाचे नाव आहे.
गंगापूरात मागील पंधरा दिवसापासून गावात अतिसार व तापाची लागण सुरू आहे.दि.१६ ऑगस्ट ला सकाळी ९ वाजताच्या सुमारास सुरज मंढरे याची अतिसरामुळे प्रकृती बिघडली.त्याला तात्काळ नवेगाव मोरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले.त्याच्यावर हगवण व उल्टीचे उपचार केल्यानंतर त्याच्या पोटात दुखायला लागले त्यामुळे त्याला तात्काळ पोंभूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक होत असल्याने त्याला चंद्रपूरला रेफर करण्यात आले.मात्र चंद्रपूर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
Shivsena ubt गंगापूर गावात येवढी मोठी साथ चालू असताना आरोग्य विभाग व प्रशासन मात्र याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. जर या गावात आरोग्य शिबीर,रक्ताचे नमुने,पाण्याचे नमुने व तात्काळ जलशुद्धीकरण संयंत्र बसविले असते तर गंगापूर गावातील या तरुणाला जीव गमावण्याची वेळ आली नसती.
योजना : माझी लाडकी बहीण योजनेचे वेबपोर्टल सुरू
नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे व गावातील नागरिकांनी घागर फोडो आंदोलन केले मात्र नागरिकांच्या मूलभूत हक्कासाठी आंदोलन का केलं म्हणून गिर्हे सहित 60 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
अभ्यासिका : चंद्रपुरात 1 लाख पुस्तकांच्या अभ्यासिकेचे लोकार्पण
त्यानंतर संदीप गिर्हे यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधारी व प्रशासनावर खडसून टीका केली होती, ते म्हणाले की जर प्रशासन नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी देऊ शकत नसेल तर आम्ही स्वखर्चाने गावात आरो लावत पाण्याची व्यवस्था करू.
2 दिवसांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी गंगापूर गावात स्वखर्चाने शुद्ध पाण्याचे संयंत्र आरो मशीन लावली, आता गावातील नागरिक आरो च्या माध्यमातून मिळत असलेले शुद्ध पाणी पीत आहे.
गंगापूर गावातील परिस्थिती आज शुद्ध पाण्या अभावी बिकट झाली आहे, प्रशासन मूक दर्शक पध्दतीने सध्या सर्व परिस्थिती कडे पाठ फिरवीत आहे, सत्ताधारी व प्रशासन आज जिल्ह्यात इव्हेंट करीत आहे मात्र गंगापूर गावात सुद्धा मुख्यमंत्री यांच्या लाडक्या बहिणी राहतात मग त्यांच्याकडे दुर्लक्ष का होत आहे? एका बहिणीला न्याय तर दुसरीवर अन्याय का हा प्रश्न आता नागरिक विचारायला लागले आहे.