Shocking Incident चंद्रपूर : राज्यात सुरू असलेल्या महिला व मुलींवर अत्याचाराच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना चंद्रपुरात पुन्हा धक्कादायक घटनेमुळे जिल्हा हादरून गेला, 52 वर्षीय पान ठेला चालकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची बाब उघडकीस आली.
पोलिसांनी आरोपी पान ठेला चालकाला अटक केली आहे, एकाच आठवड्यात या दोन घटनांनी विकृत मानसिकतेचे उदाहरण पुढे आले आहे.
अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यातून वयोश्री योजनेसाठी 10 हजार 766 अर्ज दाखल
Shocking incident पानठेल्यावर खर्ऱ्याची उधारी चुकविण्यासाठी चक्क १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करून तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार दुर्गापूर येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी दुर्गापूर पोलिसांनी आरोपीवर बबन रोहणकर (५२) याच्यावर कलम ३७६, पोक्सो, ॲट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
Shocking incident बबन रोहणकर याचा पानठेला आहे. त्याच्या पानठेल्यावर एक १६ वर्षीय मुलगी खर्रा खरेदी करण्यासाठी येत होती. तिची खर्ऱ्याची उधारी तीन हजारांवर पोहोचली होती. बबनने त्या मुलीला खर्ऱ्याची उधारी मागितली. उधारी दिली नाही तर तुझ्या वडिलांना सांगेल अशी धमकीही दिली. मात्र त्या मुलीकडे खर्ऱ्याची उधारी चुकविण्यासाठी तीन हजार रुपये नव्हते. ही संधी साधून बबनने तिला शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करून मागील तीन ते चार महिन्यांपासून तिचे लैंगिक शोषण केले. ती गर्भवती झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. याबाबत दुर्गापूर पोलिस ठाण्यात शनिवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करून ठाणेदार लता वाडीवे यांनी आरोपी बबन रोहनकरला अटक केली. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव करत आहेत.
असा उघडकीस आला प्रकार
पीडित मुलीच्या हालचालीवरून तिच्या आईला संशय आला. तिची तपासणी करण्यासाठी तिला वरोरा येथील रुग्णालयात नेले. यावेळी ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. ही बाब वरोरा पोलिसांना रुग्णालयातर्फे कळविण्यात आली. मात्र घटना ही दुर्गापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने त्यांनी दुर्गापूर पोलिस ठाण्यात याबाबत माहिती दिली. दुर्गापूर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक लता वाडीवे यांनी लगेच आरोपीला अटक केली.
विकृत मानसिकता
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड शहरात 6 जणांनी मिळून मनोरुग्ण महिलेवर अत्याचार करीत त्या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल केला, व्हिडीओ व्हायरल होताच नागरिकांनी संताप व्यक्त केला, पोलिसांनी सदर घटनेत तत्परता दाखवीत आरोपीना अटक केली, या घटनेला 2 दिवस उलटत नाही तर पुन्हा दुर्गापूर येथे घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. दोन्ही घटनेमध्ये आरोपी यांची विकृत मानसिकता असल्याचे निदर्शनास येते. चंद्रपूर जिल्ह्यातील महिला व मुली सुरक्षित रहावे यासाठी सामाजिक संघटना जागृती मशाल मंचतर्फे मध्यरात्री रॅली चे आयोजन केले आहे.