Chandrapur : गुन्हेगारांना राजकीय संरक्षण देणे बंद करा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यात जुलै महिन्यापासून गोळीबार व गंभीर गुन्ह्याचे सत्र सुरू आहे, शांत असलेल्या या जिल्ह्यात गुन्हेगारांच्या टोळी युद्धाने अशांती पसरली आहे, आता शहरातील सार्वजनिक ठिकाणी मोठे गुन्हे सहज घडत आहे, पोलीस प्रशासन सदर गुन्हे नियंत्रित करण्याबाबत अपयशी ठरला आहे.

महत्वाचे – पीकविमा कंपनीला हायकोर्टाने बजावली नोटीस

Chandrapur 2 दिवसांपूर्वी कुख्यात गुंड हाजी सरवर शेख यांची बिनबा गेट समोरील हॉटेल शाही दरबार येथे 5 जणांनी मिळून गोळ्या झाडत हत्या केली, 5 युवक चंद्रपुरात 4 बंदुका घेऊन शहरात फिरत असताना पोलीसांना याबाबत थांगपत्ता का लागला नाही? असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत घडलेल्या गोळीबाराच्या घटना सार्वजनिक ठिकाणी घडल्या आहे, चंद्रपूर शहरात 2, राजुरा व बल्लारपूर येथे प्रत्येकी 1 घटना घडली असून आतापर्यंत टोळी युद्धातून दोघांनी जीव गमावला आहे.

राजकीय : बाबूपेठ वासीयांची प्रतीक्षा संपली, उड्डाणपुलाचे काम होणार पूर्ण, किशोर जोरगेवार यांनी आणला निधी

विशेष बाब म्हणजे हाजी ची हत्या झाल्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात हाजी समर्थक व हाजी चे राजकीय समर्थकांनी गर्दी केली होती, जनप्रतिनिधी आता गुंडासमोर लोटांगण कसे घालतात हे यातून सिद्ध झालेले आहे, जनप्रतिनिधी हा जनतेचा प्रतिनिधी असतो मात्र गुंडांसाठी रुग्णालयात गराडा घालणे म्हणजे जनतेला हा काय संदेश जात आहे.

गुन्हेगारीचा कॅन्सर वाढू देणार नाही – सुधीर मुनगंटीवार

या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुंडांना राजकीय संरक्षण देणे बंद करा असे निर्देश पोलीस विभागाला दिले आहे.

चंद्रपुरातील टोळीयुद्धातून गोळीबाराच्या घटनेवर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मागील काळात गुन्हेगारांना राजकीय संरक्षण दिले गेले. ही गंभीर बाब असून गुन्हेगारांना राजकीय नेतृत्वाने पाठीशी घालू नये असे मत त्यांनी व्यक्त केले. गुन्हेगारी टोळ्या व गुंडांच्या मदतीसाठी पोलीस ठाण्यात येणारे राजकीय नेत्यांचे कॉल्स प्रसिद्ध करण्याच्या सूचना त्यांनी पोलीस अधीक्षकांना दिल्या. गुन्हेगारीचा हा कॅन्सर पुढच्या टप्प्यात जाऊ देणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!