traffic rule आपली मुलं शाळेत व्यवस्थित जात आहे काय? ज्या वाहनातून मुले जातात ती सुरक्षित आहे का? याबाबत पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या उपस्थित बैठक झाली. या बैठकीत प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, वाहतूक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, मनपा अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, शिक्षणाधिकारी, ऑटोरिक्षा तसेच स्कुल बस संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
हवाई सेवा : चंद्रपुरात लवकर सुरू होणार हवाई सेवा, खासदार धानोरकर यांचा पाठपुरावा
Traffic rule पोलीस अधीक्षक यांनी उपस्थितांना सूचना केल्या कि सर्व शाळांनी स्कुल बस सुरक्षितता नियमांचे पालन करावे, आसन क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक होणार नाही याची काळजी घ्यावी, आपला मुलगा सुरक्षितपणे शाळेत जातो काय याबाबत पालकांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, सर्व शाळांनी स्कुल बस समिती स्थापन करावी, परिवहन कार्यालयातर्फे तालुका स्तरावर मोटर वाहन निरीक्षक व सहायक मोटर वाहन निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. शाळेत येणारी स्कुल बस वाहने वैद्य आहेत किंवा नाही याची तपासणी स्कुल बस समिती मार्फत करण्यात यावी. सर्व स्कुल बसेस यांना gps ट्रॅकर व सीसीटीव्ही बसविणे आवश्यक आहे, चालक व वाहक यांना वर्षातून एकदा अग्निशमन यंत्र बाबत प्रशिक्षण द्यावे, विद्यार्थिनीवर होणारे छळ याबाबत पोलिसांना कळविणे, ऑटोरिक्षा मध्ये अतिरिक्त विद्यार्थी वाहतूक करू नये, चालकांची नियमित नेत्र तपासणी करण्यात यावी. अश्या सूचना पोलीस अधीक्षक यांनी यावेळी दिल्या.
महत्वाचे : मुख्याध्यापकाचे काम करून देण्यासाठी लिपिकाने मागितली 15 हजाराची लाच
शाळेबाबत काही तक्रार असल्यास rto कार्यालय व्हाट्सएप क्रमांक 07172-272555 व ईमेल आयडी dyrto.34-mh@gov.in वर संपर्क करावे किंवा प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे क्रमांक 7020212092 या क्रमांकावर संपर्क करावा असे निर्देश पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिले.