GMC Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांचे अपयश – पप्पू देशमुख यांचा अचूक निशाणा

GMC chandrapur चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ज्या रुग्णालयात चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्यातील तसेच शेजारच्या तेलंगणा राज्यातील हजारो रुग्ण उपचार घेतात,त्या रुग्णालयातील 5 निवासी डॉक्टरांना वस्तीगृहातील अस्वच्छतेमुळे डेंगूची लागण होणे,डेंगूची लागण झाल्यानंतर खाजगी रुग्णालयात उपचार घ्यायची वेळ येणे या सर्व गंभीर बाबी आहेत.चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाची अवस्था या निमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली.

अवश्य वाचा : चंद्रपुरातील 8 महिन्याच्या बाळाने गिळली काजळाची डबी, आणि नंतर घडलं असं


GMC chandrapur बारामती व चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाला 2014 मध्ये एकाच वेळी मंजुरी मिळाली. 2014 ते 2019 या पाच वर्षात बारामतीचे आमदार अजित पवार विरोधी पक्षात असताना तेथिल वैद्यकीय व रुग्णालयाची सुसज्ज इमारत उभी राहिली.
या काळात राज्याचे अर्थमंत्रीपद चंद्रपूर जिल्ह्याच्या वाट्याला आले होते. मात्र वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण होऊ शकले नाही. 2024 मध्ये दहा वर्षे होऊनही चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम अपूर्ण आहे. चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाला राज्य शासनाने सावत्रपणाची वागणूक दिली. राज्य शासनाने चंद्रपूर जिल्ह्यावर अन्याय केला असून बारामतीला मात्र झुकते माप दिले. हजारो रुग्णांना याचे गंभिर परिणाम भोगावे लागले,अनेक रूग्णांची मोठी हाणी झाली. त्यामुळे जिल्ह्याला अर्थमंत्री पद मिळण्यात काय ‘अर्थ’ राहिला ? हा प्रश्न सुध्दा उपस्थित होतो. दहा वर्षात वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत पूर्ण न होणे हे सर्वपक्षीय नेत्यांचे अपयश आहे. आता तरी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी आम्ही नागरिकांतर्फे करीत आहोत.


देशमुख यांनी बारामती वैद्यकीय विद्यालयाला भेट देऊन माहिती घेतली

काही महिन्यांपूर्वी पप्पू देशमुख यांनी बारामतीला जाऊन तेथिल वैद्यकीय महाविद्यालयाला प्रत्यक्ष भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी बारामती वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी, रुग्ण तसेच डॉक्टर व इतर कर्मचारी यांच्याशी संवाद साधला व संपूर्ण माहिती घेतली. चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी आपण केलेली असून रुग्णालय,प्रयोगशाळा इत्यादी महत्त्वपूर्ण इमारतीचे बांधकाम पूर्ण व्हायला किमान एक ते दीड वर्षाचा कालावधी लागणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

महत्त्वाचे : चंद्रपुरातील या इमारतीच्या छतावर डेंग्यू चा डेरा?


वस्तीगृहाच्या छतावरील पाण्याच्या टाक्या कुजलेल्या, टाकीमध्ये पाल जात असल्याचा व्हिडिओ

जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख व त्यांच्या कार्यकर्त्यांनी निवासी डॉक्टरांच्या वस्तीगृहाची पाहणी केली. पाहणीचे फोटो व व्हिडिओ त्यांनी पत्रकारांशी शेअर केले.या वस्तीगृहाच्या खोल्यांमध्ये, स्वच्छतागृहात व इमारतीच्या परिसराला अस्वच्छतेने घेरले आहे. इमारतीच्या छतावरील पाण्याच्या दोन टाक्या कुजलेल्या असून एका टाकीमध्ये पाल जातानाचा व्हिडिओ देशमुख यांनी दाखविला. येथिल निवासी डॉक्टर याच टाक्यातील पाणी वापरतात.


रामनगरमध्ये 10 वर्षांपासून ‘स्त्री’ रुग्णालयाची इमारत उभी,परंतु महिला रूग्णांना काहीच लाभ नाही

चंद्रपूरच्या शासकीय रुग्णालयात पुरेसे बेड नसल्यामुळे महिला रुग्णांचे हाल होत असल्याने शंभर बेडच्या स्वतंत्र महिला रुग्णालयाला शासनाने मंजुरी दिली. 2014 मध्ये शहरातील रामनगर मध्ये या रुग्णालयाची सुसज्ज इमारत उभी राहिली.ही इमारत 2014 मध्ये तात्पुरत्या स्वरूपात वैद्यकीय महाविद्यालयाला देण्यात आली होती. मात्र वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम अपूर्ण असल्याने महाविद्यालय प्रशासन या इमारतीवरचा ताबा सोडायला तयार नाही. जिल्हा शल्यचिकित्सकांनी ताबा सोडण्याबाबत आजपर्यंत अनेकवेळा पत्रव्यवहार केला.
आठ वर्षापूर्वी 2016 मध्ये महिला रुग्णालयासाठी पदनिर्मिती झाल्यानंतर स्वतंत्र स्त्री रुग्णालय सुरू झाले असते. हजारो महिला रुग्णांना त्याचा लाभ मिळाला असता.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!