forest department गुरू गुरनुले मुल – मुल तालुक्यातील वनपारिक्षेत्र चिचपल्ली (प्रादेशिक) उपक्षेत्र मूल नियतक्षेत्र मूल मधे मुनीम रतिराम गोलावार वय (41) वर्ष रा. चिचाला ता. मूल जिल्हा चंद्रपुर हे दिनांक 18/8/24 रोजी कक्ष क्रमांक 752 मधे बकरी चरावयास गेला सायंकाली घरी परत न आल्याने सदरची माहिती वनविभागास दिली.
आंदोलन : चंद्रपुरात महाविकास आघाडीचे निषेध आंदोलन
Forest department दिनांक 19/8/24 रोजी श्री प्रशांत खाड़े विभागीय वनअधिकारी चंद्रपुर वनविभाग व प्रियंका वेलमे वनपरिक्षेत्र अधिकारी(प्रादेशिक) चीच्पल्ली यांचे आदेशानव्ये एम. जे.मस्के क्षेत्र साहयक मूल, वनरक्षक सुधीर ठाकुर, राकेश गुरनुले संजीवनी पर्यावरण संस्थाचे उमेशसिंह झिरे व सदस्य rru टीम चंद्रपुर यांनी सकाळी 6.00 वाजता शोध घेतला असता सदर इसमाचा मृत शव आढ़ळून आला मोकयावर पोलिस कर्मचारी पंचनामा करुन शवविच्छेदन करीता उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले व आज दिनांक 24/8/25 रोजी ना. सुधीर मूंनगटीवार मंत्री, वने महारास्ट् राज्य यांचे हस्ते मृतकाची पत्नी श्रीमती चंदा मुनीम गोलावार याना 10 लक्ष रू.रकमेचे धनादेश देण्यात आले.
अवैध बांधकाम : चंद्रपूर शहरात अवैध बांधकाम
यावेळी उपस्थित मा. श्री झुरमुरे साहेब अप्पर प्रधान मुख्य वन सरक्षक नागपुर, श्री प्रशांत खाड़े विभागीय वनाधिकारी चंद्रपुर वनविभाग, प्रियंका वेलमे वनपारिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) चिचपल्ली, माजी न.प. उपाध्यक्ष नंदूभाऊ रणदिवे, श्री एम. जे. मस्के क्षेत्र साहयक मूल वनरक्षक, सुधीर ठाकुर, राकेश गुरनुले उपस्थित होते.
मूल तालुक्यात या वर्षी मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनेत वाढ झाली असून आतापर्यंत अनेकांनी आपला जीव गमावला आहे.