Intercaste marriage चंद्रपूर/गोंडपीपरी – चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपीपरी तालुक्यात असणाऱ्या पानोरा गावात आज रात्री च्या सुमारास धक्कादायक घटना घडली.
रात्री 9.30 वाजताची वेळ अचानक एक महिला विहिरी च्या दिशेने धावत आली, काही क्षणात तिने विहिरीत उडी घेतली, तिला वाचविण्यासाठी पतीने सुद्धा विहिरीत उडी घेतली आणि दोघांचा दुर्दैवी अंत झाला.
अवश्य वाचा : शासकीय रुग्णालय चंद्रपुरात फोटो/व्हिडीओ काढण्यास मनाई
Intercaste marriage गोंडपीपरी तालुक्यातील पानोरा गावातील प्रकाश शरबत ठेंगणे व उषा प्रकाश ठेंगणे अशी मृतकाची नावे आहे, तीन महिन्यांपूर्वी दोघांनी आंतरजातीय विवाह केला होता, मात्र आज दोघात असं काय घडलं की पत्नीने विहिरीत उडी घेतली, याबाबत तर सध्या प्रश्नचिन्ह आहे? ही घटना का घडली? याबाबत पोलीस तपास करतीलचं.
महत्त्वाचे : 3 वर्षांपूर्वी रानटी डुक्कराच्या हल्ल्यात काही नागरिक जखमी झाले होते, वनविभागाची मदत तब्बल 3 वर्षांनी मिळाली
पानोरा गावात विवाहित जोडप्याचा असा धक्कादायक अंत कुणालाही अपेक्षित नव्हता, हसत खेळत व चांगल्या दोघे राहत होते, घटनेची माहिती मिळताच गोंडपीपरी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाली, घटनेचा पंचनामा करण्यात आला असून दोघांचेही मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. यावेळी पानोरा गावातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
सध्या तरी मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे, पोलीस तपासनंतर दोघात काय घडलं? व यामागील कारण काय हे पोलीस सांगू शकणार. ठेंगणे दाम्पत्य यांचं लग्न झाल्यापासून काही वाद होता का? त्यांना कुटुंबीय काही मानसिक त्रास देत होते का? याबाबत आता पोलीस तपास करणार आहे.