molestation वरोरा शहरातील नामवंत महाविद्यालयातील विद्यार्थिनी सोबत शिक्षकाने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली. गुन्हा दाखल झाल्यावर आरोपी शिक्षक पसार झाले.
राज्यात महिला व मुलीवर अत्याचार प्रकरण दिवसेंदिवस वाढत आहे, या अत्याचाराची धग चंद्रपूर सारख्या जिल्हयात पोहचली आहे, यावर आता कठोर कायदे करणे गरजेचे आहे.
molestation वरोरा शहरातील नगरपालिका जवळ असलेल्या नामवंत महाविद्यालयात शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीला रूम वरती बोलून विनयभंग केल्याचा प्रकार दोन शिक्षकांनी केला आहे. या प्रकरणात दोन शिक्षकांवरती कलम 74 विनयभंग व पास्को लहान मुलीचा लैंगिक अत्याचार प्रकरणात दोन्हीही शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून वरोरा पोलीस या दोन्ही गुरुजींचा शोध घेत आहेत. गुरुजी सध्या फरार असून समाज माध्यमावर या वर्तणुकीचा निषेध दर्शवला जात आहे.
अवश्य वाचा : चंद्रपुरात दोन दिवसीय राष्ट्रीय जय भीम संमेलनाचे आयोजन
molestation नामांकित महाविद्यालयातील शिक्षक आरोपी एकमेकांचे घनिष्ठ मित्र आहेत. गुरुजी यांचा वाढदिवस असल्याने साजरा करण्यासाठी विद्यार्थिनीनी शुभेच्छा देण्यासाठी स्टॉफ रूम मध्ये पोहचले त्यावेळी मित्र शिक्षकाने संध्याकाळी पार्टी देण्याचे कबूल केले. हा सगळा प्रकार स्टॉप मध्ये बसून असणारे सहकारी मित्र यांना चांगलाच माहीत आहे. या प्रकरणातील साक्ष पोलिसांकडे आहे. यानंतर मित्र शिक्षकाने विद्यार्थीनीला फोन करून रूमवर बोलावून घेतले. साडेचार वाजता च्या दरम्यान गुरुजी यांच्या रूमवर विद्यार्थिनी आली. लगेच दुसऱ्या गुरुजीचा फोन विद्यार्थिनीला आला. यानंतर रूमवर विद्यार्थिनी आणि हे दोन गुरुजी वाढदिवसानिमित्त बोलले. गुरुजींनी वाढदिवसानिमित्त डेरी मिल्कचे चॉकलेट विद्यार्थिनीला दिले. लगेच गुरुजींनी रिटर्न गिफ्ट मागितले. रिटर्न गिफ्ट मध्ये मिठी मारण्याचा प्रस्ताव विद्यार्थिनी पुढे ठेवण्यात आला. विद्यार्थिनी ते नाकारले तेव्हा गुरुजींनी हात पकडून जबरदस्ती मिठी देण्याचा प्रयत्न केला.
धास्तावलेल्या विद्यार्थिनी ने घरचा रस्ता पकडत हा सगळा प्रकार आई-वडिलांना सांगितला. यानंतर वरोरा पोलीस स्टेशनमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी नओमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पोलीस निरीक्षक अजिंक्य तांम्हडे , एपीआय भस्मे भद्रावती येथील महिला पोलीस अधिकारी पुढील तपास करीत आहे.