join congress सध्या देशभरासह राज्यात देखील महागाईने कळस गाठला असुन सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. सोबतच युवकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. यासाठी केंद्र व राज्यातील भाजप सरकारचे चुकीचे धोरण कारणीभूत आहे. त्यामुळे युवकांचा कल आता काॅंग्रेसकडे वाढलेला दिसून येत आहे.
Join congress महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार विजय वडेट्टीवार यांच्या कार्यकाळात सुरु असलेला ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्रातील विकास बघता मोठ्या प्रमाणात ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्रातील नागरिक सुखावले असुन काॅंग्रेस पक्षाला समर्थन देत आहेत. ब्रम्हपूरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात प्रशासकीय विभागांच्या सर्व सोयीसुविधा युक्त नवीन इमारती उभ्या झाल्या आहेत. तर अनेक विकासकामे निर्माणाधीन आहेत. या सर्व विकास कामांमुळे प्रभावित होऊन व विधानसभा विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जिल्हा काॅंग्रेसचे सचिव तथा माजी न.प.सभापती विलास विखार व जिल्हा काॅंग्रेसचे उपाध्यक्ष मोंटु पिलारे यांच्या नेतृत्वाखाली ब्रम्हपूरी तालुक्यातील विविध गावांतील हजारो युवकांनी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
अवश्य वाचा : वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार
ब्रम्हपूरी येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ब्रम्हपूरी तालुक्यातील विविध पक्षातील हजारो युवकांनी पक्षप्रवेश केला आहे. यामध्ये हळदा, मुडझा, चिचगाव, जुगनाळा, चिटकबोदरा, रुई, पाचगाव, वायगाव, पारडगाव, बोडधा या गावांचा व शहरातील विविध प्रभागातील युवकांचा समावेश आहे.
गुन्हेगारी – हाजी हत्याकांड आणि राजकीय कनेक्शन
यावेळी युवा व्याख्याते बेधुंदकार गोविंद पोलाड, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ राजेश कांबळे, जिल्हा काॅंग्रेसचे सचिव विलास विखार, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, जिल्हा काॅग्रेस उपाध्यक्ष मोंटु पिलारे, सुमीत उनाडकर, युवा नेते निनाद गडे यांसह अन्य मान्यवर यावेळी मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राहुल मैंद यांनी केले. तर आभारप्रदर्शन जिल्हा काॅंग्रेस उपाध्यक्ष मोंटु पिलारे यांनी केले.
विविध पदांवर नियुक्ती
यावेळी पक्षसंघटना मजबुत करणाऱ्यासाठी कार्य युवकांना युवकांची विविध पदांवर नियुक्ती करून नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यामध्ये युवक काँग्रेसच्या शहर उपाध्यक्षपदी शुभम कावळे व एन.एस.यु.आयच्या शहराध्यक्ष पदी हिमांशू नंदुरकर यांची नियुक्ती करण्यात आली.
सोबतच यावेळी सुप्रसिद्ध युवा व्याख्याते बेधुंदकार गोविंद पोलाड यांचा प्रबोधन कार्यक्रम देखील पार पडला.