tillu pump नळावरील मीटर काढुन पाण्याचा वापर करणाऱ्या व टिल्लु पंपद्वारे पाण्याचा गैरवापर करणाऱ्या ३ नळ जोडणीधारकांवर चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत जप्तीची कारवाई करण्यात आली असुन त्यांचे नळ कनेक्शन खंडीत करून दंड ठोठाविण्यात आला आहे.दंड न भरल्यास सदर नळजोडणी धारकांना काळ्या यादीत टाकल्या जाणार आहे.
महत्त्वाचे : रास्त धान्य दुकानदारांना न्याय द्या – खासदार प्रतिभा धानोरकर
Tillu pump मनपातर्फे शहरातील सर्व नळ जोडणीवर जलमापक ( मीटर ) लावण्यात आले असुन जानेवारी महिन्यापासुन मीटरचा प्रत्यक्ष वापर सुरु आहे. वैद्य नगर येथील शिवकृपा फर्निचर जवळील रहिवासी किशोर विठ्ठलराव रिधे,राजेश बागेल व सुरेश नत्थुजी इंगळे यांच्याद्वारे नळ जोडणीवर लावलेले जलमापक (मीटर) काढुन टाकणे तसेच टिल्लू पंप लावुन पाण्याचा अनावश्यक उपसा केला जात असल्याचे मनपा पथकास पाहणी दरम्यान आढळून आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून जप्ती करण्यात आली आहे.
सर्व नळ जोडणींवर मनपाद्वारे मीटर लावण्यात आले असल्याने पाण्याचा जेवढा वापर होईल तेवढेच देयक येत असुन अनावश्यक खर्च व अनावश्यक पाण्याच्या वापरावर नियंत्रण आले आहे.मात्र काही नागरिक नळाचे देयक कमी करण्याच्या दृष्टीने मीटरला लागुन असलेला पाईप काढतात ज्यामुळे पाण्याचा वापर करतांना मीटर बंद असते व बिल अतिशय कमी येते,शिवाय टिल्लु पंप द्वारे मोठ्या प्रमाणात पाणी एकाच कनेक्शनवर ओढले जाऊन इतर नळधारकांना अतिशय कमी प्रमाणात पाणी पुरवठा होतो.
अतिशय महत्त्वाचे : चंद्रपूर जिल्ह्यातील ही पर्यटन स्थळे बंद
त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम लक्षात घेता मनपातर्फे टिल्लू पंप लावणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली असुन नळावरील मीटर काढल्यास अथवा विद्युत पंप/ टिल्लू पंप लावला असल्याचे आढळल्यास मनपाच्या जप्ती पथकांद्वारे कारवाई केली जात आहे.