today acb trap मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाल्यावर सेवा कालावधी दरम्यान जमा असलेल्या अर्जित रजेच्या नोंदी प्रमाणित करण्याकरिता व मुख्याध्यापक यांचे कवरिंग पत्र लेखाधिकारी शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्याकडे पाठविण्याकरिता मुख्याध्यापक यांच्या शाळेतील लिपिकाने सदर काम करण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच मागीतिली, मात्र माजी मुख्याध्यापक यांनी याबाबत थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार देत कनिष्ठ लिपिक व त्यांच्या खाजगी इसमाला अटक करायला लावली.
महत्त्वाचे : 17 ऑगस्टला चंद्रपुरात सुरू होणार ओबीसी वसतिगृह
Today acb trap वाढोणा तालुका नागभीड येथील समाजसेवा विद्यालयातून वर्ष 2022 मध्ये सेवानिवृत्त झालेले तक्रारकर्ते मुख्याध्यापक यांनी सेवा कालावधी दरम्यान अर्जित रजेच्या नोंदी प्रमाणिकरण करण्याकरिता मुख्याध्यापक यांचे कवरिंग पत्र लेखाधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्याकडे पाठवायचे होते मात्र त्याच विद्यालयातील कनिष्ठ लिपिक 54 वर्षीय मोहम्मद अकील इस्माईल शेख यांनी सदर काम करण्यासाठी माजी मुख्याध्यापकाला 15 हजार रुपयांची लाच मागीतली.
लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने माजी मुख्याध्यापक यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला 6 ऑगस्टला तक्रार नोंदविली. 7 ऑगस्टला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सदर तक्रारीची पडताळणी केली.
8 ऑगस्टला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याबाबत सापळा रचला लिपिक मोहम्मद शेख यांनी तडजोडीअंती पहिला हफ्ता 5 हजार व काम झाल्यावर नंतर 10 हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली.
वाढोणा येथील अपना टी स्टोल अँड नास्ता पॉईंट येथे मोहम्मद शेख यांनी माजी मुख्याध्यापकला बोलाविले.
त्याठिकाणी 5 हजार रुपये कनिष्ठ लिपिक मोहम्मद अकिल इस्माईल शेख यांनी तक्रारदार यांच्याकडून 5 हजार रुपये स्वीकारत ते पैसे खाजगी इसम 34 वर्षीय श्रीकृष्ण परसराम शेंडे यांच्याकडे दिली, त्याच क्षणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कनिष्ठ लिपिक व खाजगी इसम शेंडे यांना रंगेहात अटक केली.
दोन्ही आरोपीना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक लाचलुचपत विभाग राहुल माकनिकर, अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक मंजुषा भोसले, पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, नरेश नन्नावरे, राकेश जांभुळकर, अमोल सिडाम, मेघा मोहूर्ले, रवी तायडे यांनी केली.
विशेष बाब म्हणजे ज्या शाळेत मुख्याध्यापक यांनी विद्यार्थी घडविले, त्याना चांगली शिकवण दिली पण त्याच शाळेतील लिपिक हे चांगल्या शिक्षणाचा बोध घेऊ शकले नाही. मात्र मुख्याध्यापकाने शिस्तबद्धता पाळत लाचखोर वृत्तीला ठेचून काढले.