Jai Bhim : चंद्रपुरात दोन दिवसीय राष्ट्रीय जयभीम साहित्य संमेलनाचे आयोजन

jai bhim 31 ऑगस्ट रोजी चंद्रपुरातील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात 2 रे राष्ट्रीय जयभीम साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

Jai bhim आयोजित राष्ट्रीय जय भीम साहित्य संमेलनात नागरिकांना विविध सांस्कृतिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांची मेजवानी बघायला मिळणार आहे. लोकजागृती नाट्यकला सांस्कृतिक, शैक्षणिक संस्था चंद्रपूर व जयभीम संमेलन समिती चंद्रपूर तसेच डॉ.बाबसाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कल्चरल सेंटर टाकळी जिल्हा चंद्रपूर यांच्या वतीने 2 दिवसीय जयभीम साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

अवश्य वाचा : गणेश विसर्जनासाठी चंद्रपुरात भव्य विसर्जन कुंड तयार

आयोजित संमेलनात देशभरातील साहित्यिक, वैचारिक लोक कलावंत, जलसाकार, नाटककार, वक्ते, मंत्री, खासदार, आमदार, चळवळीतील कार्यकर्ते, कवी तसेच आयएएस अधिकारी उपस्थित राहणार आहे. 31 ऑगस्टला संमेलनाचे उदघाटन विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते होणार असून उदघाटन कार्यक्रमात जेष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, दिल्ली सरकार मधील माजी सामाजिक न्यायमंत्री राजेंद्र पाल गौतम, खासदार प्रतिभा धानोरकर, खासदार बळवंत वानखेडे, खासदार नामदेव किरसान, आमदार सुभाष धोटे उपस्थित राहणार आहे.

कार्यक्रमाचे आकर्षण

31 ऑगस्टला रात्री 8 वाजता जयभीम कवी संमेलन, यामध्ये कवी खेमराज भोयर, नरेंद्र सोनारकर, जसबीर चावला, मिर्जा पठारे, सीमा भसारकर, ब्रह्मानंद मडावी यांचा सहभाग असणार आहे. कवी समेलनानंतर जयभीम आंबेडकर वादी जलसा, सुप्रसिद्ध गायिका सुषमा देवी, गायक रविराज भद्रे, धम्मजित तिगोटे जलसा सादर करणार.

दुसऱ्या दिवशी 1 सप्टेंबर ला जयभीम विद्रोही गीते, राहुल सूर्यवंशी, निशा धोंगळे, अश्विनी खोब्रागडे, उपेंद्र वनकर, विजय पारखी, रविराज विद्रोही व मास्टर सोमकुवर यांचा सहभाग असणार आहे. विद्रोही भीम गीतानंतर जयभीम परिसंवाद ज्यामध्ये भारतीय लोकशाही जपण्यासाठी निवडणूक आयोग, मीडिया व मतदारांची भूमिका या विषयावर अण्णा साहेब पाटील, पीव्ही मेश्राम, ईसादास भडके, अनमोल शेंडे, दिलीप चौधरी, रमेशचंद्र दहिवडे, खुशाल तेलंग, सतीश पेंदाम, कोमल खोब्रागडे, अभिलाषा गावतुरे, नम्रता ठेमस्कर मार्गदर्शन करणार आहे.

Jai bhim परिसंवाद कार्यक्रम नंतर एकपात्री नाटक ज्यामध्ये व्हय मी सावित्री बोलतेय याचे सादरीकरण होणार आहे, रात्री जयभीम रत्न पुसरकर व समारोपीय समारंभ, यामध्ये जेष्ठ विचारवंत उत्तम कांबळे, विजय वडेट्टीवार, आमदार नितीन राऊत, राजकुमार बडोले, आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबाले, आमदार किशोर जोरगेवार, मनोहर चंद्रिकापुरे, अनिल हिरेखन, बापूसाहेब गजभारे, सिद्धार्थ हत्तीअंबोरे, संतोष रावत उपस्थित राहणार आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रमानन्तर जयभीम बुद्ध गीतांचा महाजलसा कार्यक्रम, सादरकर्ते चंद्रकांत शिंदे, कडू बाई खरात, आणि मंजुश्री शिंदे.

मागच्या वर्षी आयोजित पहिल्या जयभीम राष्ट्रीय साहित्य संमेलनात नागरिकांची लक्षणीय उपस्थिती बघता यंदा शहरात काही ठिकाणी led लावण्यात येणार आहे अशी माहिती आयोजन अनिरुद्ध वनकर यांनी दिली आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!