Python : रोवणी सुरू असताना शेतात आला अजगर

python गुरू गुरनुले मूल – मुल तालुक्यात सध्या धान रोवणीचे काम जोरात सुरु असून सकाळ पासूनच शेतकरी बांधव व महिला मजूर शेतात जातात. रोवनिच्या कामासाठी भंजाळी येथील शेतकरी मनीष भांडेकर यांचे शेतात रोवन्याचे काम सुरू असतांना काही महिलांना शेताच्या बांधावर एक भलामोठा अजगर साप दिसला. त्यामुळे महिला घाबरून गेल्या. अतीशय घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी ही माहिती शेतमालकाला दिली.

अवश्य वाचा : लाडकी बहीण योजनेचे याचं महिलांना मिळणार 3 हजार रुपये

शेतमालकाने तात्काळ संजीवन पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष उमेशसिंह झिरे यांचेशी संपर्क करुन घटनेची माहिती दिली. माहिती मीळताच संस्थेचे सदस्य अंकुश वाणी ला सोबत घेऊन शेतातील त्या भल्या मोठ्या अजगराला स्थानिक दोन युवकांच्या मदतीने पकडले.

राजकीय : भावी अधिकाऱ्यांच्या मदतीला धावले विरोधीपक्ष नेते वडेट्टीवार

Python भंजाळी हे गाव पोंभुर्णा वनपरिक्षेत्रात येत असल्याने ही माहिती वनरक्षक विनोद कस्तूरे यांना देण्यात आली. भल्या मोठ्या अजगराला पकडुन गावकरी आणि महिला मजुरांना भयमुक्त केल्यामुळे त्यांनी संजीवन पर्यावरण संस्थेच्या सदस्यांचे आभार मानले. अजगराची लांबी जवळपास साडेबारा फुट असुन वजन तीस कीलोच्या जवळपास आहे.

अजगरांच्या विभिन्न जाती

अजगरांच्या बऱ्याच जाती आहेत. पायथॉन रेटिक्युलेटस हा सर्वांत मोठा अजगर ब्रह्मदेश व इंडोचायनापासून फिलिपीन्स बेटांपर्यंत आढळतो त्याची लांबी १० मी. पर्यंत असते. पा.मोलुरस ही भारतातील सामान्य जाती सुमात्रा आणि जावामध्येही आढळते. पा. सेबी ही आफ्रिकेतील जाती सुमारे ६ मी. लांब असते. पा. रेजियस आणि पा. स्पायलोटिस या अनुक्रमे आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियात आढळणाऱ्‍या जाती दिसायला सुंदर असतात.

भारतीय अजगर सामान्यतः २․५-५ मी, लांब असतो, पण ७-८ मी. लांबीचे नमुनेही आढळतात. त्याचे शरीर बरेच अवजड असते. रंग फिक्कट पिवळा असून त्यावर गर्द तपकिरी रंगाचे साधारण चौकोनी सुंदर ठिपके असतात. डोक्यावर बाणाच्या आकृतीचा एक मोठा डाग असतो.

लहान खडकाळ टेकड्यांच्या उतरणीवर आणि नद्या व मोठे तलाव यांच्या आसपास तो आढळतो जंगलातही तो असतो. अजगराला वरचेवर तहान लागत असल्यामुळे पाण्याच्या जवळपास रहाण्याची त्याला जरूरी भासते.

पक्षी आणि हरणाएवढे सस्तन प्राणी यांवर तो आपली उपजीविका करतो ऑस्ट्रेलियातील अजगर सुसरींवरदेखील उपजीविका करतात.

उंच झाडावरील फांदीला शेपटीने विळखे घालून शरीर लोंबकळत ठेवून तो भक्ष्याची अत्यंत जागरूकतेने टेहळणी करीत असतो. भक्ष्य आटोक्यात येताच त्याच्या अंगावर झेप घेऊन त्याच्या अंगाभोवती विळखे घालून तो घट्ट आवळतो भक्ष्याच्या फुप्फुसावर आणि हृदयावर दाब पडल्यामुळे ते गुदमरून मरते नंतर खूप मोठा आ वासून तो ते हळूहळू गिळतो. अजगर विषारी नसतो. अचाट शक्ती असलेला हा प्रचंड साप सुस्त असून त्याच्या हालचाली मंद असतात. तो सहज माणसाळतो.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!