Independence Day : सामाजिक उपक्रम राबवित स्वातंत्र्य दिन साजरा

Independence day स्वतंत्रता दिवस व शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सुरू असलेल्या भगवा सप्ताह चे औचित्य साधून 15 ऑगस्टला युवासेना काॅलेज कक्ष च्या वतीने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे,शिवसेना- युवासेना सचिव वरूनजी सरदेसाई यांच्या आदेशानुसार,युवासेना विभागीय सचिव, सिनेट सदस्य प्रा निलेश दादा बेलखेडे यांच्या संकल्पनेतून, विस्तारक संदिप रियाल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे निशुल्क बुक बॅंक च्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य किट तसेच महिलांना वृक्ष रोपटे भेट देऊन स्वतंत्रता दिवस साजरा करण्यात आला.

अवश्य वाचा : नवीन चंद्रपुरात 10 हजार घरांची योजना

Independence day सदर कार्यक्रम काॅलेज कक्षाचे आदर्श लाडस्कर यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला यावेळी स्वतंत्रता सैनिक, महापुरूषांना अभिवादन करून विद्यार्थी, महिलांना स्वतंत्रता दिनाचे महत्त्व, सांगून उपस्थितींना सामाजिक कार्यात सर्वांनी सहभागी होऊन एकमेकांना सहकार्य करावे हा संदेश सुद्धा देण्यात आले. यावेळी काॅलेज कक्षाचे रोशन टेंभरे,विकी मेश्राम,गणेश नक्षिणे ,टिकेश गेडाम ,प्रणय मोहितकर, अयान खान व हिमांशू तपासे यांची उपस्थिती होती.

लाडकी बहीण योजना बंद होणार या अफवेवर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं स्पष्टीकरण

युवासेना कॉलेज कक्ष मागील अनेक दिवसांपासून सामाजिक उपक्रमात सहभागी होत आहे, विद्यार्थ्यांचे प्रश्न असो की सामाजिक बांधिलकी या कार्यात कॉलेज कक्ष नेहमी अग्रेसर असतो. सिनेट सदस्य व युवासेना विभागीय सचिव निलेश बेलखडे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेज कक्ष आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेना व युवासेना मध्ये निलेश बेलखडे सक्रिय सहभाग घेत अनेक समस्यांना वाचा फोडण्याचे काम करीत आहे, सिनेट सदस्य निवडीच्या आधी त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम केले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!