Missing : 13 वर्षीय नैतिक बाबूपेठ मधून बेपत्ता

Missing चंद्रपूर शहरात सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या धामधुमीत 13 वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याने कुटुंब मुलाच्या भेटीसाठी व्याकुळ झाले आहे.

Missing 13 वर्षीय नैतिक कृष्णा लांजेवार असे बेपत्ता मुलाचे नाव आहे, नैतिक हा जुनोना रोड, साई मंदिर जवळ बाबूपेठ येथे राहतो, 13 सप्टेंबर ला नैतिक हा सायंकाळी 6 वाजता परिसरातील गणपती बघायला घरून निघाला, रात्री 9 वाजताच्या सुमारास नैतिक हा मराठा चौक बाबूपेठ येथे गणपती बघायला गेला होता, मात्र तो परत घरी न आल्याने नैतिक च्या वडिलांनी इतरत्र त्याची विचारणा केली असता तो कुठेही आढळून आला नाही.

अवश्य वाचा : राष्ट्रध्वजाचा अपमान, आप आक्रमक

नैतिक हा सामान्य घरातील मुलगा असून तो आई-वडिलांना एकुलता एक आहे, नैतिक च्या वडिलांनी संपूर्ण बाबूपेठ परिसरातील ठिकाण शोधले मात्र नैतिक चा काही पत्ता लागला नाही, नैतिक अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंब चिंतेत पडले आहे, याबाबत पोलिसात तक्रार झाली असून नैतिक कुणालाही आढळल्यास याबाबत मोबाईल क्रमांक – 7821094595 वर सम्पर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नैतिक हा दुसऱ्या दिवशी लालपेठ परिसरात मिळून आलेला आहे तरी सदर बातमी शेअर करू नये….धन्यवाद

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!