Oyo Hotel : चंद्रपूर जिल्ह्यातील ओयो का आले चर्चेत?

oyo hotel चंद्रपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी असलेले oyo हॉटेल पुन्हा चर्चेत आले असून त्याचे कारणही तसेच आहे, मात्र यावर चौकशी होणार का? हा सध्यातरी संशोधनाचा विषय आहे.

Oyo hotel वर्ष 2012 मध्ये Oyo चे संस्थापक रितेश अग्रवाल यांनी कमी किमतीत व कमी वेळेत लोकांना हॉटेल बुक करण्यात यावे यासाठी oravel stays च्या नावाने स्टार्ट अप सुरू केला होता, 2013 मध्ये अग्रवाल यांनी स्टार्टअप चे नाव oyo ठेवले आणि या ओयो ने जगात एकच धुमाकूळ घातला. Oyo चा अर्थ म्हणजेच on your own असा आहे.

सुरुवातीला बजेट हॉटेलचा यामध्ये समावेश होता, हळूहळू ओयो ने जगात पाय पसरवीत तब्बल 80 देशात व्यवसाय सुरू केला असून त्यांनी 10 लाख खोल्या भाडेतत्वावर घेतल्या आहे. आज प्रत्येक पर्यटन स्थळ देशात ओयो चे काम धडाक्यात सुरू आहे, मात्र याबाबत चंद्रपूर जिल्ह्यात चौकशी करण्याची मागणी का झाली आहे, यावर आपण माहिती जाणून घेऊ या.

महत्त्वाचे : मुख्यमंत्री योजनादुत मध्ये काम करायचे आहे? तर असा करा अर्ज

Oyo hotels in chandrapur बल्लारपूर शहरात अल्पवयीन मुलीसोबत मुलाने शारीरिक संबंध प्रस्थापित केले, त्याबाबत पोलिसात तक्रार झाली, मुलाला अटक झाली मात्र मुलीने दुसऱ्या दिवशी आत्महत्या करीत आपले आयुष्य संपविले, आता आपल्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की यामध्ये ओयो चा काय दोष? दोष आहे, कारण या हॉटेल मध्ये अल्पवयीन मुलींना प्रवेश नाही, कोणत्याही मुलांसोबत या हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलींना प्रवेश नाकारण्यात येतो मग बल्लारपूर मधील त्या ओयो मध्ये परवानगी त्यांना कशी देण्यात आली?

ओयो रूम बुक करण्यासाठी ऑनलाइन प्रणालीचा वापर होतो, आपल्याला आधारकार्ड व इतर प्रक्रिया पूर्ण केल्यावर रूम बुक होते, मात्र काही ओयो हॉटेल धारक हे नियम पायदळी तुडवीत पैसे कमविण्याच्या नादात अल्पवयीन मुलींना प्रवेश देण्याचे काम करतात, चंद्रपुर शहरात तर झाडी-झुडपात ओयो हॉटेल सुरू आहे, शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय च्या मागे जंगल भागात ओयो सुरू आहे? ती परवानगी त्यांना कशी मिळाली? त्यावर कारवाई का नाही? कारण त्याठिकाणी असे अनेक प्रकार झाल्याची चर्चा सुरू आहे? ओयो च्या बाजूला राहणाऱ्या नागरिकांनी सुद्धा अनेक अल्पवयीन मुलींना बघितलं असल्याची माहिती दिली आहे.

Oyo hotel बल्लारपूर येथील सामाजिक कार्यकर्ते व नागरिक, यासह मनसे ने सुद्धा ओयो हॉटेलची चौकशी करण्याची मागणी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे, चंद्रपूर जिल्ह्यात झपाट्याने ओयो ची वाढ होत आहे, ओयो नी जर नियमानुसार कार्य केले तर कुणीही त्याच्यावर नाव बोटं ठेवणार नाही मात्र अल्पवयीन मुलींना प्रवेश दिल्यास ओयो धारक मोठ्या अडचणीमध्ये येऊ शकतो हे निश्चित.

ओयो हॉटेल: ओयो चंद्रपूर जिल्ह्यात नियमांचे उल्लंघन करत आहे का? ऑनलाइन प्रणाली वापरून ओयो रूम्स ऑनलाइन बुक करता येतात, जिथे आधार कार्ड आणि इतर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर रूम बुक केली जाते. मात्र, काही ओयो हॉटेल मालक योग्य पडताळणी न करता बेकायदेशीरपणे अल्पवयीन मुलींना प्रवेश देऊन या यंत्रणेचा गैरफायदा घेत असून अशा घटना चंद्रपूर शहरात विशेषत: शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालया मागील जंगल परिसराजवळ घडत असल्याचा संशय आहेत. त्यांनी यासाठी परवानगी कशी मिळवली आणि कारवाई का झाली नाही? ओयो जवळील रहिवाशांच्या देखील अशा घटना लक्षात आल्या आहेत ज्यात अल्पवयीन मुलींचा समावेश आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!