abhay scheme in maharashtra महावितरणने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन योजना जाहीर केली आहे. वीज कनेक्शन तोडलेल्या ३८ लाख घरगुती, व्यावसायिक, आणि औद्योगिक ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेत, थकीत वीजबिलावरचे व्याज आणि विलंब शुल्क माफ होणार आहे. सदर योजना 1 सप्टेंबर पासून राज्यात लागू करण्यात आली आहे.
Abhay scheme in maharashtra महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणकडून अभय योजना सुरु करण्यात आलीय. १ सप्टेंबरपासून ही योजना अंमलात येतेय.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनुसार महावितरणने हा निर्णय घेतलाय.
वीजबिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या ३८ लाख घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी अभय योजनेचा फायदा होणार आहे.
याअंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण १७८८ कोटी रुपये माफ केले जाणार आहेत.
या योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधीत वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नव्याने वीज कनेक्शन मिळेल.
महावितरणच्या वेबसाईटवर वीज ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने याचा लाभ घेता येईल.
काय आहे ही योजना?
अभय योजना ही महावितरणची नवीन योजना आहे. या अंतर्गत ग्राहकांना थकीत वीजबिल भरण्यासाठी सवलत दिली जाणार आहे. (Abhay scheme in maharashtra) जे ग्राहक आपल्या थकीत वीजबिलाचे भरण करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई टाळण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे.
- कालावधी: १ सप्टेंबर २०२४ ते ३० नोव्हेंबर २०२४.
- लाभार्थी: घरगुती, व्यावसायिक, आणि औद्योगिक ग्राहक.
- व्याज आणि विलंब शुल्क माफी: थकीत वीजबिलावरील एकूण १,७८८ कोटी रुपये माफ.
महावितरणच्या वेबसाईट (www.mahadiscom.in/wss/wss) किंवा मोबाइल ॲपवर अर्ज करता येईल. ग्राहक टोल फ्री क्रमांकावर कॉल करूनही माहिती मिळवू शकतात.
- टोल फ्री क्रमांक: १९१२, १८००२३३३४३५, १८००२१२३४३५
ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सदर योजना लागू करण्यात आली असून लाखो वीज ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळविता येणे शक्य होणार आहे, थकीत वीज बिल भरून पुन्हा वीज कनेक्शन या योजनेमुळे पुन्हा मिळणार आहे. हे सर्व महायुतीच्या कल्याणकारी सरकारमुळे सदर योजना अंमलात आली आहे.