Adani group कार्मेल एज्युकेशन सोसायटी, घुग्घुस द्वारा संचालित माऊंट कार्मेल कॅान्व्हेंट उच्च माध्यमिक शाळा, घुग्घुस या इंग्रजी माध्यमाच्या स्वयं अर्थसहाय्यित उच्च माध्यमिक (वर्ग १ ते १२) शाळेचे अदानी फाॅऊडेशन, अहमदाबाद या संस्थेस हस्तांतरीत करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन होता. यासंदर्भात ३० जून २०२४ रोजी शिक्षण उपसंचालक नागपूर यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला.
Adani group या प्रस्तावावर अवघ्या तीन महिन्यात राज्य शासनाने निर्णय घेतला आणि शाळा अदानीच्या घशात टाकली. शाळा अदानीकडे हस्तांतरीत करताना शासनाने काही अटी-शर्थी सुद्धा लादल्या. त्या भविष्यात किती पाळल्या जातील, हे येणारा काळच ठरविले. मात्र आता अदानीला या शाळेच्या पटसंख्येत बदल करता येणार नाही. शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पूर्ण दायित्व अदानी समूहाकडे राहणार आहे. येत्या पंधरा दिवसात अदानी या शाळेचे व्यवस्थापन ताब्यात घ्यायचे आहे.
अवश्य वाचा : सण, उत्सव काळात अधिकृत वीज जोडणी घेण्याचे महावितरण चे आवाहन
अदानी फाऊंडेशनला माऊंट कार्मेल कॅान्व्हेंटचे व्यवस्थापन राज्य शासनाने दिले. मात्र व्यवस्थापन बदलण्यासंदर्भात शासनाकडे अथवा शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी प्राप्त झाल्यास तसेच व्यवस्थापन बदला संदर्भातली अर्टी आणि शर्थीचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास. येथे कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्थीचा नवीन संस्थेद्वारा भंग झाल्या हस्तांतरण रद्द करण्याच अधिकार शासनाने आपल्याकडे ठेवले आहे. Adani group
यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी x च्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधत जोरदार हल्ला केला आहे, ते म्हणाले की महाराष्ट्र विक्री आता सुरू झाली आहे, चंद्रपुरातील घुग्गुस माउंट कारमेल शाळेचा ताबा सरकारने अदानी समूहाला दिला आहे. महाराष्ट्र विक्रीला काढल्याचे हे उत्तम उदाहरण आहे.
सत्य काय?
मागील 50 वर्षांपासून घुग्गुस येथे माउंट कारमेल ची स्थापना झाली होती, सदर शाळेचे संपूर्ण व्यवस्थापन acc सिमेंट च्या अंतर्गत होते, मात्र वर्षभरापूर्वी acc सिमेंट कंपनीला अदानी समूहाने विकत घेतल्याने सदर शाळेचा कारभार सुद्धा अदानी समूहाकडे आला आहे.
जेव्हा संपूर्ण acc सिमेंट कम्पनी अदानी समूहाने ताब्यात घेतली तर शाळेचं काय? हा प्रश्न होता त्यामुळे रीतसर पध्दतीने अदानी समूहाने शाळा आपल्या व्यवस्थापनाच्या ताब्यात घेतली. सदर शाळेत सिमेंट कम्पनी मधील कामगारांची मुले सवलतीच्या दरात शिकत आहे, मात्र काही काळापासून सिमेंट कंपनीच्या प्रदूषणाचा फटका शाळेला बसला त्यामुळे अदानी समूह सदर शाळा प्रदूषण पासून दूर रहावी यासाठी दुसरीकडे वळविण्याचा निर्णय घेतला असून नव्या इमारतीचे काम सुद्धा सुरू करण्यात आले आहे.