Agricultural land चंद्रपूर मागील अनेक पिढ्यांपासून आदिवासी व गैर आदिवासी शेतकरी शेती कसत आहे, मात्र आजही असंख्य शेतकऱ्यांना शेत जमिनीचे पट्टे मिळालेले नाही, अतिक्रमनाची शेती असल्याने वन प्रशासन मार्फत शेतीवरील शेतकऱ्यांचे अतिक्रमण काढण्याचे काम सुरू आहे, सदर बाब ही गंभीर स्वरूपाची असून आदिवासी, गैर आदिवासी शेतकऱ्यांना शेतीचे पक्के पट्टे देण्यात यावे यासंदर्भात 24 सप्टेंबर रोजी शिवसेना ठाकरे गटातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
Agricultural land अनेक पिढ्यापासून शेती करीत असलेल्या आदिवासी, गैर आदिवासी शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचे काम शासनातर्फे करण्यात येत आहे, यामुळे शेतकरी हवालदिल होत आहे. वनविभाग व महसूल विभागाने फर्मान जारी करीत अतिक्रमित जमिनीवर आपला दावा करीत शेतकऱ्यांचे अतिक्रमण काढण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे.
अवश्य वाचा : चंद्रपुरात 100 कोटीचे भगदाड
यावर शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे म्हणाले की आदिवासी, गैर आदिवासी शेतकरी कडून शेतजमिनी हिसकावल्या तर त्यांच्याकडे मरणाशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या दाव्यावर प्रशासनाने दखल घेत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचे पक्के पट्टे देण्यात यावे सोबतच शहरातील नागरिकांना त्यांच्या घराचे पट्टे सुद्धा देण्यात यावे अशी मागणी गिर्हे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
जर शेतकऱ्यांच्या या मागण्या पूर्ण करण्यात आल्या नाही तर जिल्ह्यातील अतिक्रमण शेतकऱ्यांना सोबत घेत जिल्हाधिकारी कार्यालय समोर तीव्र आंदोलन करणार असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी प्रशासनाला दिला आहे.