Annual General Meeting : रणरागिणी महिला नागरी पतसंस्था बाबूपेठची आमसभा

Annual General Meeting रणरागिणी महिला नागरी सहकारी पतसंस्था बाबूपेठ र न 447/2022 या पतसंस्थेची आमसभा नुकतीच पतसंस्थेच्या कार्यालयात पतसंस्थेच्या अध्यक्ष सौ चंदाताई वैरागडे यांचे अध्यक्षतेखाली सर्व संचालक मंडळ यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

Annual General Meeting आमसभेत सौ चंदाताई वैरागडे यांनी संपूर्ण वर्षाचा लेखाजोगा सादर करताना वर्षातील जमा -खर्च ,कर्ज वाटप ,इतर खर्च तसेच वर्षभरात राबविलेले विशेष उपक्रम यावर सविस्तर इतिवृतांचे वाचन करून आपल्या मनोगतातून पतसंस्थेच्या महिला सदस्यांच्या विश्वासामुळे आपली पतसंस्था भरभराटीला आली असून यावर्षी पतसंस्था नफ्यात आहे.

अवश्य वाचा : नियंत्रण सुटलं आणि ट्रक पलटी झाला, काय घडलं चंद्रपुरात

महिलांनी दाखविलेल्या विश्वसामुळेच महाराष्ट्रात पहिली महिला बचत गटाची एकमेव पतसंस्था आपल्या चंद्रपूर शहरातील बाबूपेठ मध्ये स्थापन करू शकली यांचा सार्थ अभिमान आहे,असेच सहकार्य आणि विश्वास भविष्यात कायम ठेवाल अशी अपेक्षा करते आणि आपल्या विश्वासाला किंचितही तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही देते असे मनोगतातून सांगितले.

ट्रक पलटी

या आमसभेला अध्यक्ष सौ चंदाताई वैरागडे ,उपाध्यक्ष वंदना खेडकर,सदस्य सौ वैशाली ऐसेकर,लीला बुटले,सौ संगीता वैरागडे सौ स्नेहल अंबागडे, श्रीमती उज्वला कार्लेवार, सौ.सुवर्णा भारस्कर सौ अपर्णा धकाते,उषा तंगडपल्लीवार यांचे प्रमुख उपस्थितीत पतसंस्थेच्या जवळपास 400 महिला सदस्य यांचे उपस्थितीत पार पडली. आमसभेची सांगतां राष्ट्रगीताने करून सर्वाना चहा नास्ता देऊन सभा समाप्त करण्यात आली.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!