Bail Pola 2024 : ग्रामीण भागातील बैल पोळा

Bail Pola 2024 गुरू गुरनुले, बैल पोळ्याचे आयोजन निमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे केला शेतकऱ्यांचा सत्कार
बाजार समिती आवारात भरला पोळा


Bail pola 2024 – आजचा दिवस भारतीय सण समारंभांमध्ये आपल्या संस्कृतीचं देखील दर्शन होतं. बैलपोळा हा सण देखील त्याचंच उदाहरण आहे. कृषीप्रधान भारत देशामध्ये अन्नदात्यासोबत बैल देखील शेतात राबत असतो. बैलपोळ्याच्या निमित्ताने त्याला आराम देत त्याच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते. मग या बैलपोळ्याच्या देण्यासोबतच बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व बैलपोळ्याच्या निमित्ताने त्याचा साजश्रृंगार केला जातो. पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. तर शेतीच्या कामातून देखील सुट्टी दिली जाते.

अवश्य वाचा : चंद्रपूर शहरात शिरले पुराचे पाणी

Bail pola 2024 महाराष्ट्रात सारेच शेतकरी या निमित्ताने घरातील पशूधनाला जपतात. मग हा दिवस आनंदाने साजरा केला जातो. बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी खांदमळणीचा कार्यक्रम असतो. पळसाच्या द्रोणात कढी घेऊन ती बैलाच्या खांदयावर मळली जाते त्याला खांदमळणी असेही म्हणतात. या निमित्ताने शिंगे साळून त्याला हुंगुळ लावण्याची रीत आहे. आंबाडीचे सुत काढून त्याची वेसन बैलाच्या नाकात घालण्याची पद्धत आहे. नविन घुंगर माळा, नविन झुल वेगवेगळया प्रकारचे हिंगुळ बैलाच्या शिंगांना लावून पोळयाच्या दिवशी बैलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असतो. त्या निमित्ताने बाजार समिती चे आवारात बैल पोळा भरविण्यात येऊन बैल जोडी घेऊन येणाऱ्या सर्व सहभागी शेतकऱ्यांना दुप्पटा व प्रोत्साहन म्हणून बक्षीस व उत्कृष्ट बैल जोडी सजावट केलेल्या नकटू घोगरे,रमेश गणवेंनवार,अनिल बॅटे, गणपत कोरडे,वसंत बोबाटे, भीमराव बोरकर,विनोद चौखुंडे, दशरथ जवादे, सयाजी बटे, माधव राऊत, डोमाजी चौखुंडे, या शेतकऱ्यांचा शाल देऊन सन्मान केला.

मशाल रॅली

यावेळी समितीचे सभापती राकेश रत्नावार उपसभापती राजेंद्र कन्नमवार संचालक घनश्याम येनुरकर, अमोल बच्चुवार, रमेश बरडे, तुलाराम घोंगरे, मूल तालुका काँग्रेस कमिटीच अध्यक्ष गुरु गुरनुले,मुल शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष सुनील शेरकी सर, समितीचे सचिव अजय गंटावार, सुनील मंगर,राजू गेडाम,बबलू सय्यद, आयटलवार, इतर कर्मचारी उपस्थित होते. समितीचे सभापती राकेश रत्नावार व राजेंद्र कन्नमवार उपसभापती, उपस्थित संचालक यांनी समस्त शेतकरी बांधवांना बैल पोळ्याच्या शुभेच्छा दिल्या.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!