Candle March : बल्लारपूर शहरात महिला अत्याचार विरोधात कँडल मार्च


candle march देशात व राज्यात होणाऱ्या महिला अत्याचार विरोधात बल्लारपूर शहरात नागरिकांनी कँडल मार्च काढत आरोपीना फाशीची मागणी केली आहे.

Candle march बल्लारपूर – महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधामध्ये 6 सप्टेंबर रोजी बल्लारपुरामध्ये समस्त बल्लारपूर वासीयांतर्फे आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला.
देशामध्ये महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये झालेल्या लक्षणीय वाढीमुळे देशातील महिला आणि मुली अत्यंत असुरक्षित झालेले आहेत दिवस असो वा रात्र असो वा रस्ता मंदिर असो वा ऑफिस आज महिला स्वतःला कुठेही सुरक्षित आहोत असं म्हणू शकत नाही आणि ही महिला सुरक्षितता केंद्रामध्ये आलेल्या बीजेपी आणि मोदी सरकारच्या महिला विरोधी धोरणांमुळे आहे कारण दिल्ली पासून कलकत्ता पर्यंत आणि बदलापूर पासून बल्लारपूर पर्यंत ज्या पुरुषवादी मानसिकतेतून महिला आणि मुलींवर अत्याचार होत आहेत त्याला वेळोवेळी पाठ राखण करण्याचे काम हे देशातील केंद्र सरकार करत आहे.

कँडल मार्च

जगामध्ये आमचं नाव रोशन करणाऱ्या महिला पैलवानाच शोषणच जेव्हा एक केंद्रीय मंत्री करतो आणि प्रधानमंत्री त्याची पाठराखण करतात देशातील सामान्य महिला सुरक्षित कशा राहू शकतात हे सरकार महिला विरोधी आहे हे बिलकीसबानो प्रकरणातील घृणीत आरोपींना 15 ऑगस्ट च्या दिवशी मोकळं करून या सरकारने दाखवून दिलेल आहे हातरस येथील पीडितेवर झालेल्या अत्याचारानंतर तिला जाळून टाकण्याचे घृणीत काम या मोदी सरकारने केलेल आहे.

अवश्य वाचा : पीक विमा बाबत महत्वाची बैठक


Candle march या देशांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न आज निर्माण झालेला आहे नेत्यांच्या आणि मंत्र्यांच्या सुरक्षेमध्ये शेकडो पोलिसांना तैनात करून महिलांना असुरक्षित वातावरणामध्ये ठेवल्या जात आहे ओयो सारख्या हॉटेल वाल्यांना अशा कुकर्मामधे सामील होण्यासाठी सरकारकडूनच प्रोत्साहन मिळत आहे की काय असं बल्लारपूरच्या घृणीत घटनेवरून दिसून येत आहे हॉटेल वाल्यांना काही निती नियम आहेत की नाही आणि सरकार म्हणून प्रशासनाचे काही नियंत्रण या सगळ्या व्यवस्थेवर आहे की नाही असा प्रश्न आज निर्माण झालेला आहे आणि म्हणून आज बल्लारपूरच्या महिलांना आणि समस्त बंधू-भगिनींना या सर्व अत्याचाराच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरून निदर्शने करावी लागत आहेत.

Candle march आज महिलांचा हा कॅन्डल आणि मशाल मार्च तीन एक्का गेट बल्लारपूर वरून निघाला आणि बल्लारपूर शहराच्या मुख्य रस्त्यावरून रेल्वे स्टेशन चौकातून वापस येत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदना करीत या मोर्चाचा समारोप करण्यात आला यावेळी समाजसेविका डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनी बल्लारपूरकरांना महिला आणि एकूणच नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत शपथ दिली या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात बल्लारपुरातील महिला पुरुष, युवक-युवती यांनी भाग घेतला यात प्रामुख्याने विवेक खुटेमाटे, ताहेर हुसैन, रोजिदा ताजुद्दीन, विजय मुसळे करुणा शेगांवकर, अनीश खान, साजिद शेख, आनंदराव अंगलवार, सतीश मालेकर, श्रीकांत सुंदरगिरी, अजय शाह, शिवबच्चन राजभर, मुकद्दर खान, शाहीद शेख , मोहित शेख, अलविना शेख, adv रोहिणी , करुणा शेगांवकर, अब्दुल आबिद, शकील खान, पूजा महुर्ले, तंजीला सैयद, संजीदा बाजी, एलेस नातर्गी, बशीर खान, आबिद खान, दीपक बनोत, यासिर खान शाहिद खान, समीर शेख, अनिल कलवाला, अंजू भाई , लता नागौसे, शबीर शेख यांच्याशिवाय शेकडो बल्लारपूरकरांनी रॅलीमध्ये भाग घेतला.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!