caste politics प्रतिभा धानोरकर यांच्या “त्या” वक्तव्यानंतर सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांनी दिला अल्पसंख्यकांना भाजप नंतर काँग्रेस पासून सावध राहण्याचा इशारा
Caste politics ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघ असो की गडचिरोली, या दोन्ही ठिकाणी अल्पसंख्यांक समाजाचे लोक प्रतिनिधित्व करीत आहेत. ही परंपरा आता खऱ्या अर्थाने बदलण्याची वेळ आली आहे, असे म्हणत काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी काँग्रेस नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे नाव न घेता त्यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्याचे आवाहन कुणबी महाधिवेशनात नुकतेच केले.
Contents
ब्रम्हपुरी येथे हे अधिवेशन झाले. वडेट्टीवार हे अल्पसंख्यांक समाजाचे प्रतिनिधित्व करतात हे येथे उल्लेखनीय. रविवारी ८ सप्टेंबर रोजी ब्रम्हपुरी येथे झालेल्या कार्यक्रमाला चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार तथा वडेट्टीवार यांच्या काँग्रेस पक्षातील विरोधक प्रतिभा धानोरकर यांच्यासह कुणबी समाजातील नेते उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वडेट्टीवार यांचे नाव न घेता त्यांना ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातून पराभूत करा, असे आवाहन केले.
महत्वाचे – या कुंडात गणेश मूर्तीचे विसर्जन नकोचं – चंद्रपूर मनपा
Caste politics काही वर्षे ब्रह्मपुरी आणि गडचिरोलीत बहुसंख्य समाजाचे प्रतिनिधित्व अल्पसंख्य समाजाचे लोक करीत आहेत, ही परंपरा बदलण्याची हीच खरी वेळ आहे. कुणबी समाज काही राजकारणी लोकांच्या भूलथापांना बळी पडतो. आगामी विधानसभा निवडणुकीत हे चित्र बदला, असे जाहीर आवाहन धानोरकर यांनी केले. वडेट्टीवार यांच्यावर त्यांच्याच मतदारसंघात त्यांच्याच पक्षाच्या खासदारांनी टीका केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अल्पसंख्यांक समाजाबद्दल काँग्रेस च्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केलेल्या सदर व्यक्तव्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी सर्व जाती धर्मातील अल्पसंख्यकांना भाजप नंतर आता काँग्रेस पासूनही सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. काँग्रेस मध्ये सुद्धा कुणबी फॅक्टर चे जातीवाद सुरु असून यामुळे आज वड्डेटीवार बद्दल प्रतिभा धानोरकर असं बोलत असून उद्या अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती, आदिवासी, मुस्लिम, जैन, पारशी व इतर अल्पसंख्यकांना सुद्धा असे लोक राजकारणात येऊ न देता आजही गुलामगिरीत ठेवण्याची यांची मानसिकता असल्याचे यावरून दिसून येत आहे.
लोकसभा निवडणुकीत माझे पती चे अवकाळी निधन झाले असे इमोशनल कार्डच्या आडून कुणबी कार्ड खेळल्या गेले. अल्पसंख्याक समाजातील लोकांनी मोदी नकोच म्हणत एक महिला म्हणून प्रतिभा धानोरकर याना खासदार बनवून लोकसभेत पाठविले. मात्र जनतेची कामे न करता आता आपण जनप्रतिनिधी आहोत हे भान विसरून आपण कुणबी आहो असे बोलण्याने सर्व अल्पसंख्यांक समाजामध्ये नाराजी उमटली असून असले जाती कार्ड खेळणाऱ्या सत्तेच्या लवकरच माज आलेल्या खासदार प्रतिभा धानोरकर यांना सर्व अल्पसंख्यांक समाजांनी मिळून येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवावा, ओबीसी समुदायातील कुणबी वगळता बाकीच्यांनी काय यांच्या सतरंज्या उचलायचा का असा खोचक टोलाही सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांनी लगावला आहे.