chandrapur cha raja 10 दिवस चाललेल्या गणेश उत्सवाचा आज शेवटचा दिवस, शहरातील सार्वजनिक गणेश मंडळातील गणेश मूर्तीचे थाटामाटात विसर्जन होणार आहे, शहरातील प्रसिद्ध चंद्रपूर चा राजा जटपुरा गणेश मंडळाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.
chandrapur cha raja अनंत चतुर्दशी 17 सप्टेंबर ला शहरातील गणेश विसर्जन सोहळ्याला सुरुवात झाली आहे, शहरातील मानाचा गणपती चंद्रपूर चा राजा ची विसर्जन मिरवणुक सुरू झाली आहे, ढोल-ताशाच्या गजरात गणेश भक्त आपल्या लाडक्या बापाला निरोप देण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित आहे.
अवश्य वाचा : व्यायाम करताना हार्ट अटॅक, चंद्रपुरातील घटना
गणेश विसर्जन सोहळा दरम्यान नागरिकांना वाहतूक संबंधी त्रास होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने वाहतुकीत बदल केला आहे, पोलीस प्रशासनाने सुचविलेल्या मार्गाचा वापर नागरिकांनी करावा असे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी कळविले आहे.