chandrapur crime चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात एकाच दिवशी दोन अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आले, एका प्रकरणात 35 वर्षीय मतिमंद महिलेवर अत्याचार तर दुसऱ्या प्रकरणात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला, 4 सप्टेंबर रोजी पीडित अल्पवयीन मुलीने आत्महत्या करीत आयुष्य संपविले.
Chandrapur crime पहिल्या घटनेत एका अल्पवयीन ( वय १६ ) मुलीवर प्रेम प्रकरणातून लैंगिक शोषण केले आहे. आरोपी ने त्या मुलीला फूस लावत लॉजवर नेऊन तिच्या सोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याबाबत मुलीची आत्या व पीडितेने बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली, पोलिसांनी गुन्हा दाखल करीत मौलाना आझाद वार्डातील आरोपी 20 वर्षीय शिवम दिनेश दुपारे ला अटक केली. या प्रकरणी शांती लॉज ओयो मालक व व्यवस्थापक यांची चौकशी या प्रकरणात सुरू आहे, ओयो हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलींना नेण्यास मनाई आहे हे माहीत असताना सुद्धा व्यवस्थापक यांनी त्यांना परवानगी दिली कशी? चौकशी झाल्यावर गुन्हा दाखल करू अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांनी दिली.
Chandrapur crime दुसऱ्या घटनेत एका ३५ वर्षीय मतिमंद महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे. सदर महिला मतिमंद असून ती आपल्या आई सोबत राहते. तिची आई एका हॉटेलमध्ये काम करत असून सकाळी कामाला जाऊन रात्री घरी येते. त्या घरभाड्याने राहतात. दिवसभर पीडित महिला घरी एकटीच असते. आरोपी घरमालकाच्या ओळखीचा असून तो २ सप्टेंबर रोजी दारू पिऊन आला यावेळी पीडित महिला घरी एकटीच असल्याचा फायदा घेऊन दुपारच्या सुमारास तिच्यावर बलात्कार केला. सदर घटना घरमालकाच्या लक्षात येताच जेव्हा तिची आई रात्री घरी आली तेव्हा घडलेला प्रकार सांगितला त्यावरून आई ने मंगळवार दि. ३ सप्टेंबरला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी शिव नगर, बल्लारपूर येथील चंदू बालू भुक्या (५८ वर्षीय ) आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी विरुध्द ६४ (२) (के), ३३२ (क) बीएनएस २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल केले आहे या प्रकरण विषयी दिपक साखरे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी पोलीस स्टेशन येथे भेट दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वर्षा नैताम, पोलीस उपनिरीक्षक गोविंद चाटे करीत आहे.
अवश्य वाचा : भाजप आमदार नितेश राणे यांना अटक करा
पहिल्या प्रकरणातील अल्पवयीन मुलीने गळफास घेत आत्महत्या केली, दुपारच्या सुमारास घरी कुटुंब असताना पीडित मुलगी दुसऱ्या रूम मध्ये गेली आणि तिथे गळफास घेत आत्महत्या केली, पोलिसांना याबाबत कसलीही सुसाईड नोट सापडलेली नाही, याबाबत पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील मुली व महिला सुरक्षित रहाव्या यासाठी नुकतीच शहरात मशाल रॅली काढण्यात आली होती, अश्या घटना जिल्ह्यात घडू नये याबाबत सध्या नागरिकांमध्ये जनजागृती ची गरज आहे, याबाबत प्रशासनाने जनजागृती ची मोहीम हाती घ्यावी, अल्पवयीन मुले, मुली व त्यांच्या पालकांना सुद्धा जागृत करावे अन्यथा अश्या घटनांना आळा बसणार नाही.