Chandrapur Transport System चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात 16 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद निमित्त आयोजित जुलूस व रॅलीमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. यादरम्यान रहदारीला कोणताही अडथळा तसेच जनतेला त्रास होऊ नये व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी 16 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजता पासून दुपारी 3 वाजेपर्यंत शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.
Chandrapur transport system या बदलानुसार कोहिनूर ग्राउंड – दस्तगीर चौक- गांधी चौक- जयंत टॉकीज चौक -जटपुरा गेट ते प्रियदर्शनी चौक व प्रियदर्शनी चौक -जटपुरा गेट- कस्तुरबा रोडने कोहिनूर ग्राउंड पर्यंतचा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांना बंद ठेवण्यात येत आहे. तसेच हा रस्ता नो पार्किंग झोन म्हणून घोषित करण्यात येत आहे.
अवश्य वाचा : असंख्य युवकांचा शिवसेना पक्षात प्रवेश
नागपूरकडून शहरांमध्ये जाणारी वाहने (जड वाहने वगळून) घुटकाळा, श्री टॉकीज पठाणपुरा परिसरात जायचे असल्यास जुना वरोरा नाका चौकातून उजवीकडे वळण घेऊन रामनगर -संत केवलराम चौक- सेंट मायकल स्कूल -सवारी बंगला चौक नगिनाबाग ते चोर खिडकी मार्गे शहरात प्रवेश करतील.
चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील रहिवाशांनी नागपूर, वणी, घुग्गुस , गडचांदूर कडे जाणाऱ्या प्रवाशांनी रहमतनगर, नगीना बाग व इतर परिसरातून जाण्यासाठी बिनबा गेट, रहमत नगर, दाताळा इत्यादी मार्गाचा अवलंब करावा तसेच बल्लारशा व मूल कडून येणारी वाहनांना शहरांमध्ये जावयाचे असल्यास बस स्टॅन्ड, एलआयसी ऑफिस, बगड खिडकी मार्गे किंवा जूनोना चौकातून शहरांमध्ये किंवा प्रसन्ना पेट्रोल पंपकडून बाबुपेठ मार्गे शहरात प्रवेश करता येईल.
जुलूस व रॅली दरम्यान वरील वाहतूक व्यवस्थेचे सर्व नागरिकांनी पालन करून जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले आहे.