Doctor transfer : डॉक्टरसाठी शेकडो नागरिकांनी काढला निषेध मोर्चा

doctor transfer गडचांदूर येथील डॉक्टर प्रवीण येरमे यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी त्यांची अचानक बदली झाल्याने नागरिकांनी याविरोधात निषेध मोर्चा काढला.

Doctor transfer गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण येरमे यांची कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी बदली केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे, सामाजिक कार्याची जाणं ठेवणारे व प्रत्येक रुग्णाच्या मदतीला नेहमी तत्पर असणाऱ्या डॉक्टरांची अचानक बदली का केली म्हणून स्थानिक एससी, एसटी व ओबीसी बांधवांनी निषेध मोर्चा काढला.

निषेध मोर्चा

ही बदली राजकीय उद्देशातून करण्यात आल्याचा निषेधार्थ गडचांदूर शहरात आदिवासी समाजाकडून भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात कोरपना, जिवती या तालुक्यातील मोठ्या संख्येने आदिवासी समाजतील पुरुष, महिला ,तरुण, लहान मुले सहभागी झाले होते. डॉ. प्रवीण येरमे यांची बदली तत्काळ रद्द करा अशी यावेळी मोर्चा द्वारे मागणी करण्यात आली.
एखाद्या अधिकाऱ्याच्या बदली विरोधात मोर्चा निघण्याची पहिली वेळ असल्यामुळे हा मोर्चा गडचांदुर शहरात लक्षवेधी ठरला होता.

अवश्य वाचा : ओयो बाबत चंद्रपूर मनसे आक्रमक, सर्व ओयो हॉटेल्सची चौकशी करा

कोण आहे डॉक्टर प्रवीण येरमे?

संघर्षमय जीवनाचा प्रवास करीत MBBS, MD पदवी घेऊन वैद्यकीय सेवेत रुजू झालेले प्रवीण येरमे यांना सामाजिक कार्याची चांगलीच जाण आहे, ज्या आदिवासी क्षेत्रात शासनाच्या वैद्यकीय सेवा देण्यासाठी अनेकजण नकार देतात त्या भागात डॉ येरमे स्वतः पोहचत त्यांनी वैद्यकीय सेवा दिली, अतिदुर्गम आदिवासी व दलित मागास समाजात डॉ येरमे यांनी आपल्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम केले आहे, वैद्यकीय सेवेचे महत्व व शिक्षणाचे काय महत्व आहे हे पटवून देण्याचे काम डॉ येरमे यांनी केले आहे, मात्र त्यांची अचानक पणे बदली करीत प्रशासनाने कुठेतरी राजकीय दबावाला बळी पडत वैद्यकीय सेवेपासून मागासलेल्या समाजाला पोरकं करण्याचे काम केले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!