mashal rally chandrapur चंद्रपूर शहरात जागृती मशाल मंच द्वारे भव्य मशाल रॅली 31 ऑगस्टला रात्री काढण्यात आली, रॅलीची सुरुवात गांधी चौकातून सुरू करण्यात आली.
Mashal rally chandrapur राज्यात महिला अत्याचारात वाढ होत असताना चंद्रपूर जिल्ह्यात महिला व मुली सुरक्षित रहाव्या यासाठी मशाल रॅली काढण्यात आली.
महत्त्वाचे : चंद्रपूर जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट
आयोजित रॅली मध्ये खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले, आमदार किशोर जोरगेवार व शहरातील विविध सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला, रॅली मध्ये महिलांच्या हातात धगधगती मशाल होती, आपण एकत्र आहो, आपल्या आई, बहीण व मुलींची सुरक्षा आपल्या हातात आहे अशी मनात भावना निर्माण करण्याचा आजच्या रॅली चा उद्देश, शहराचे मार्ग क्रमन करीत सदर रॅली प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौकात पोहचत उपस्थित नागरिक महिला सुरक्षेची शपथ घेण्यात आली.
यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपली प्रतिक्रिया देत असताना राज्यात आम्ही शक्ती कायदा अस्तित्वात आणला मात्र अद्यापही तो लागू करण्यात आला नाही, तो कायदा लागू करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
जागृती मशाल मंच सदस्य सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी म्हणाल्या की आज आम्ही महिला सुरक्षेची मशाल पेटवली आहे ती आता पुढे पेटतच राहणार, महिला मुलींबाबत अप्रिय घटना घडता कामा नये हा आमचा प्रयत्न राहणार आहे, अश्विनी खोब्रागडे ह्या म्हणाल्या की आतापर्यंत आपण गुड टच बॅड टच, सायंकाळी लवकर घरी यावं हे ज्ञान फक्त मुलींना दिलं मात्र आता हे सर्व मुलांना पण सांगणे गरजेचे आहे तेव्हाच समाजात खरी जनजागृती होणार.