heart attack in gym चंद्रपूर: जिममध्ये व्यायाम करतांना एका इसमाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास चंद्रपूरातील नागपूर मार्गांवर असलेल्या इरई मल्टीफिट जिममध्ये घडली.
रोहीत जालान (50) असे मृतकाचे नाव आहे. ह्रदयविकाराने त्याचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.
अवश्य वाचा : गणेश विसर्जन, या परिसरात दुकाने लावण्यास मनाई
heart attack in gym नागपूर महामार्गांवर चढ्ढा यांची इरई मल्टीफिट नामक जिम आहे. या जिममध्ये रोहित जालान हा व्यायामासाठी येत होता. सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास जिममध्ये व्यायामासाठी आला असता, त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले. दरम्यान जिममध्ये व्यायाम करणाऱ्यांनी त्याला रूग्णालयात दाखल केले. मात्र, रूग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून अधिक तपास पाेलिस करीत आहे.