Human Wildlife Conflict : मूल तालुक्यात पुन्हा वाघाचा हल्ला

Human Wildlife Conflict (गुरू गुरनुले) चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात वन्यजीव यांची दहशत अद्यापही कायम आहे.

जाणाळा येथील गुराखी वाघाच्या हल्यात ठार मूल- मुल तालुक्यातील जाणाळा येथील वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार जखमी झाल्याची घटना आज दिनांक 1 रोजी दुपारी घडली. गुलाब वेळमे वय वर्ष 50 राहणार जाणाळा असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या गुराखीचे नाव आहे.
जाणाळा येथून जवळच असलेल्या डोनी फाट्याजवळ सराईत गाई, गुन्हे चरायला नेला होता. दबा धरून बसलेल्या वाघाने गुराखीवर हल्ला करून ठार केले. ही घटना गावात माहिती होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली आहे. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

अवश्य वाचा : चंद्रपुरात महिला सुरक्षेची पेटली मशाल


Human Wildlife Conflict मूल तालुक्यात वाघाचे हल्ले मानवावर वाढल्याचे दिसून येत आहे त्यामुळे ग्रामीण भागात चिंतेची बाब झाली आहे. वन्य प्राण्यांचे असे हल्ले आम्ही किती सहन करायचे असे गावकऱ्यात बोलल्या जात आहे. माणूस महत्त्वाचा की वाघ अशी ही चर्चा होत आहे. गावकऱ्यांनी वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. मागील पंधर वाड्यातील वाघाच्या हल्यात गुराखी ठार झाल्याची तिसरी घटना आहे.

चंद्रपुरात निघाली भव्य मशाल रॅली

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!