tanha pola 2024 बैल पोळा झाल्यावर दुसऱ्या दिवशी लहान मुलांचा तान्हा पोळा साजरा होतो, मात्र यंदा महागाई मुळे लाकडी बैलांच्या किमती वाढल्या आहे.
Tanha pola 2024 लाकूड काम करणारे यांचे महागाई मुळे कंबरडे मोडले आहे, लाकडी बैलाची किंमत आज 500 रुपयांच्या वरून सुरू होते, चंद्रपूर शहरातील गांधी चौकात लागणारा लाकडी बैल बाजारात यंदा चांगलीच गर्दी जमली, यामध्ये विविध प्रकारचे लाकडी बैल विक्री करीता आणले होते. 500 पासून तर तब्बल 1 लाख रुपयांपर्यंत लाकडी बैलांचे भाव वधारले आहे. गांधी चौकात मागील 25 वर्षांपासून लाकडी बैल विक्री करण्याकरिता आणणारे विक्रेते यांनी याबाबत माहिती दिली की यंदा महागाई मुळे लाकडी बैलांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
आधी 200 रुपयाला मिळणारे लाकडी बैलाची किंमत 2 हजार रुपये झाली आहे, आम्ही मागील 25 वर्षांपासून सदर काम करतो, लाकडी बैलासाठी लागणारे आंब्याच्या झाडाचे लाकूड, सुबाबरी व शिसम चा उपयोग होतो, आधी सागवान लाकुडाचा वापर व्हायचा मात्र सागवान चा बैल बनविला तर त्याची किंमत खूप जास्त असल्याने ग्राहक ते घेत नाही, त्यामुळे आम्ही त्याचा वापर करीत नाही.
अवश्य वाचा : चंद्रपुरातील या बहीण-भावाला मिळाली 1 कोटी 90 लाखांची शिष्यवृत्ती
2 हजार रुपयांचा लाकडी बैल बनविण्यासाठी आम्हाला तितकाच खर्च येत आहे, महागाई वाढल्याने लाकूड सहसा उपलब्ध होत नाही आहे, रंग रंगोटी करण्यासाठी आता नवे रंग घ्यावे लागतात ज्यामुळे लाकडी बैलाला चांगली चकाकी मिळते, त्याच्या किमती सुद्धा जास्त आहे, त्यामुळे बाल गोपालांच्या तान्हा पोळा महाग झाला अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
गांधी चौकात तान्हा पोळा निमित्त लागलेल्या बाजारात 1 लाख, 75 हजार, 60, 51, 45, 35, 25 हजारांचे लाकडी बैल उपलब्ध आहे, किमती वाढल्या पण बाल गोपालांचा हट्ट आई-पुरवीत असून सदर तान्हा पोळा उत्साहाने साजरा होणार हे नक्कीचं.