Chandrapur flood 2024 1 सप्टेंबर रोजी हवामान विभागाने चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट दिला होता, त्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर मनपाने नागरिकाना सतर्क राहण्याचा इशारा दिला होता.
Chandrapur flood 2024 आज 2 सप्टेंबर ला सकाळी वर्धा नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढल्याने इराई नदी पात्रात पाण्याचा दाब मोठ्या प्रमाणात वाढला, अनेक ठिकाणी मार्ग बंद झाले तर शहरातील रहमत नगर भागात 10 ते 12 घरे पाण्याखाली आले, त्यामुळे नागरिकांची चांगली वाताहत झाली, बिनबा गेट जवळील ग्रामीण भागात जाणाऱ्या मार्गावरील पुलाजवळ इराई नदीच्या पातळीत वाढ झाली.
अवश्य वाचा : रेशनवरील मोफत तांदूळ बंद
सध्या इराई नदीचे पाणी स्थिर असल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकते त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
सध्या शहरातील पठाणपुरा गेट च्या बाहेरील भाग, बिनबा गेट बाहेर, नांदगाव सहित झरपट नदीमध्ये पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नदी पात्रजवळ राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क रहावे, सद्या पाणी स्थिर असल्याने पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी नदी पात्रजवळ जाऊ नये.