Anganwadi sevika : सरकारचे आश्वासन फसवे, चंद्रपुरात जेलभरो आंदोलन

Anganwadi sevika महाराष्ट्र सरकारचे दिलेले आश्वासन फसवे निघाल्याने आज चंद्रपुरात हजारो अंगणवाडी सेविकानी जेलभरो आंदोलन केले.


Anganwadi sevika चंद्रपूर शहरात आज अंगणवाडी सेविकांचे जेलभरो आंदोलनाने प्रशासन हादरून गेलं, चंद्रपूर जिल्हा परिषद समोर हजारो अंगणवाडी सेविकानी चक्का जाम करीत जेलभरो आंदोलनात सहभाग घेतला.

शासनाच्या योजना अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचविल्या जात आहे मात्र त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचे काम महाराष्ट्र सरकार द्वारे केल्या जात आहे.

अवश्य वाचा : चंद्रपुरात आला बिबट्या, उडाली खळबळ

मानधनात वाढ, पेन्शन सुरू करावी, ग्रॅच्युईटी देण्यात यावी अश्या अनेक मागण्या घेऊन आज अंगणवाडी सेविकानी मोर्चा काढत जेलभरो आंदोलन केलं, या आंदोलनात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
सदर आंदोलनाचे नेतृत्व सिटू कामगार नेते रमेशचंद्र दहिवडे यांनी केले, यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे उपस्थित होते.

जेलभरो आंदोलन


रमेशचंद्र दहिवडे म्हणाले की 25 जानेवारीला महाराष्ट्र सरकारने अंगणवाडी सेविकांना पेन्शन, मानधनात वाढ व ग्रॅच्युईटी देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आज 8 महिने लोटल्यावर सुद्धा आश्वासनाची पूर्तता झाली नाही,त्यावेळी अंगणवाडी सेविका यांनी 52 दिवस आंदोलन केले होते. आजचं जेल भरो आंदोलन इथं थांबणार नाही, यापुढे आम्ही गावागावात जाऊन सरकारच्या फसवेगिरी बाबत जागृती करणार.

खासदार प्रतिभा धानोरकर ह्या म्हणाल्या की आज अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना आपल्या हक्कासाठी भांडावे लागत आहे ही अत्यंत खेदाची बाब आहे, मी आमदार असताना याबाबत अनेकदा पाठपुरावा केला, आता खासदार झाल्यावर यापुढेही आम्ही अंगणवाडी सेविकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार.

आयोजित जेलभरो आंदोलनात हजारो अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!