Leopard attack : बिबट्याने केली 7 वर्षीय मुलाची शिकार

Leopard attack वनाने वेढलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहचला आहे, 20 सप्टेंबर ला घरासमोर शौच करीत असलेल्या 7 वर्षीय मुलाला बिबट्याने उचलत त्याची शिकार केली.

महत्त्वाचे : शहरात कांग्रेसचे निषेध आंदोलन

Leopard attack दुर्गापुरातील मसाळा गावात 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान 7 वर्षीय भावेश तुराणकर हा घराच्या मागील बाजूस शौचास बसला होता, शौच झाल्यावर भावेश उठला आणि रस्त्याकडे धावत गेला तितक्यात दबा धरून बसलेल्या बिबट्याने भावेश वर झडप घेत त्याला उचलून नेले.

अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात वाघ व बिबट्याचे हल्ले वाढले, वनविभागावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

बराच वेळ झाल्याने भावेश घरी न परतल्याने आई-वडिलांनी त्याचा शोध घेतला, त्यानंतर काहींना परिसरात बिबट दिसला अशी माहिती दिली असता याबाबत वनविभाग व दुर्गापूर पोलिसांना माहिती देण्यात आली.
दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक लता वाढीवे ह्या मसाळा गावात दाखल झाल्या, पोलीस व गावकऱ्यांनी रात्रभर शोधमोहीम राबवली मात्र भावेश कुठेही आढळून आला नाही. (Leopard attack)

सकाळी तुराणकर यांच्या घरापासून 300 मीटर अंतरावरील पद्मापुर सब एरिया कार्यालय जवळील झाडावर काहींना बिबट बसलेल्या अवस्थेत दिसला, वनविभाग व पोलीस विभाग त्याठिकाणी दाखल झाला, नागरिकांची गर्दी वाढली, वनविभागाने बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र बिबट त्याठिकाणांहून पळून गेला.
पोलीस व वनविभागाची चमू ने झाडाखाली शोध घेतला असता तिथे भावेश चा छिन्न विछिन्न अवस्थेत मृतदेह आढळला.

वनविभागावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा


अत्यंत क्रूर पध्दतीने भावेश ला बिबट्याने खाल्ले होते.
यानंतर घटनास्थळी गावकऱ्यांनी जमाव केला, भावेश चा मृतदेह बघताच कुटुंबाने टाहो फोडला, नागरिक क्रोधीत झाले, तणावाची स्थिती निर्माण झाली, पोलीस निरीक्षक लता वाढीवे यांनी परिस्थिती हाताळत भावेश चा मृतदेह उत्तरीय चाचणीसाठी रुग्णालयात पाठविला.
मृतक भावेश हा पहिल्या वर्गात शिकत होता, भावेश च्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दुर्गापूर, सीएसटीपीएस ला ताडोबा जंगलाचा भाग लागून आहे, अनेकदा त्याठिकाणी वाघ, बिबट व अस्वलांचा वावर आढळून आला आहे, मागील 3 वर्षात फक्त दुर्गापूर भागात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जवळपास 15 नागरिकांचा मृत्यू झाला, मानव वन्यजीव संघर्षांच्या घटनेत वाढ होत असताना वनविभागाने या घटनांवर आळा बसविण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज होती मात्र इतक्या वर्षात कसलीही उपाययोजना वनविभागाने केली नसल्याने आज पुन्हा अशी दुर्दैवी घटना उघडकीस आली.

या परिसरात वेकोली कार्यालय आहे, त्याचठिकानी वेकोलीचा कचरा टाकल्या जातो, म्हणून त्याठिकाणी डुक्कराचा वावर वाढला, शिकारीच्या शोधात असलेल्या वन्य प्राण्यांना या भागात अलगद शिकार उपलब्ध होते, त्यामुळे मसाळा भागात वन्यप्राणी येऊ लागले अशी सर्वत्र चर्चा आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!