leopard in city : चंद्रपूर शहराच्या मध्यभागी बिबट्याचे आगमन

leopard in city चंद्रपूर जिल्हा हा चारही बाजूने वन सौंदर्याने नटलेला आहे, या भागात अनेक वन्यप्राण्यांचा वावर आहे, अश्यात काही वन्यप्राणी अनेकदा रस्त्यावर तर काही गावात वावरताना आढळून येतात.


Leopard in city 5 सप्टेंबर ला पहाटेच्या सुमारास शहरात अचानक बिबट्या शिरला, त्या बिबट्याचा मागे कुत्रे लागल्याने त्याने पळ काढत थेट बिनबा गेट जवळील बोबडे यांच्या घराच्या बाजूला असलेल्या झुडपात आश्रय घेतला सदर बाब नागरिकांना कळताच याबाबत त्यांनी तात्काळ वनविभागाला माहिती दिली, सध्या वनविभाग बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न करीत आहे.

शहरातील बिनबा गेट परिसरात बिबट शिरल्याची घटना समोर आली आहे. याची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार ऑन द स्पॉट दाखल झाले असून, सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. येथे जमलेली गर्दी पाहता, सुरक्षा वाढविण्याच्या सूचना त्यांनी केल्या असून, बिबटला जेरबंद करण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी विभागीय एसीएफ आदेश शेणगे, वन अधिकारी प्रशांत खाडे, वन अधिकारी नायगमकर यांच्यासह पोलिस विभागातील अधिकाऱ्यांची उपस्थिती आहे.

अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात 19 सप्टेंबर पर्यंत कलम 36 लागू


Leopard in city पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बिनबा गेट लगत असलेल्या झाडी-झुडपांमध्ये बिबट वावरत असल्याचे काही नागरिकांना दिसले. याची माहिती लगेच वन विभागाला देण्यात आली. माहिती मिळताच वन विभाग आणि पोलिस विभागातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सोबतच याची माहिती आमदार किशोर जोरगेवार यांना पोहोचताच ते मुंबईहून थेट घटनास्थळी पोहोचले. सध्या बिबटला पकडण्यासाठी वन विभागाचे अधिकारी प्रयत्न करत आहेत. रेस्क्यू पथकही येथे दाखल झाले आहे. येथे होत असलेली नागरिकांची गर्दी पाहता दंगा नियंत्रण पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. या सर्व कार्यवाहीवर आमदार किशोर जोरगेवार स्वतः लक्ष ठेवून असून, त्यांच्या वतीने प्रशासनाला योग्य सूचना करण्यात येत आहेत.

शहरात बिबट्या


त्यांनी दूरध्वनीवरून पोलिस अधीक्षकांशीही संपर्क साधत पोलीस विभाग यासंदर्भात अनेक सूचना केल्या आहेत. येथे पोलिस बंदोबस्त वाढविण्यात यावा, काही भाग प्रतिबंधित करण्यात यावा, अशी सूचना यावेळी त्यांनी पोलिस अधीक्षकांना केली आहे. तसेच तहसीलदार आणि वन विभागाच्या मोठ्या अधिकाऱ्यांशीही ते सतत संपर्कात आहेत. नागरिकांना कोणतीही हानी न होता नियोजनबद्ध पद्धतीने बिबटला जेरबंद करण्यासाठी वन विभाग प्रयत्न करत असून, आपण स्वतः येथे उभे राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!