maharashtra Apprenticeship Training शासकीय, निमशासकीय आणि खाजगी आस्थापनांमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण कायद्याअंतर्गत शिकाऊ उमेदवारांची भरती वाढवून प्रोत्साहित करण्यासाठी ‘महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना’ राज्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या शिकाऊ उमेदवारांना देय विद्यावेतनाच्या 75 टक्के किंवा जास्तीत जास्त पाच हजार रुपये, यापैकी कमी असलेले विद्यावेतन शासनातर्फे अनुज्ञेय आहे.
maharashtra Apprenticeship Training तथापि, राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना आणि महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवारांना अनुज्ञेय ठरणारा विद्यावेतनाचा आर्थिक लाभ एकत्रितपणे देय एकूण विद्यावेतनाच्या 75 टक्के पेक्षा अधिक अनुज्ञेय ठरणार नाही. ज्यांनी 3 जून 2021 पासून शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण पूर्ण केले आहे किंवा सध्या करीत आहेत, अशा सर्व शिकाऊ उमेदवारांनी https://maps.dvet.gov.in या पोर्टलवर नोंदणी करून त्यांचा महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेंतर्गत दरमहा विद्यावेतन प्राप्त करण्यासाठी अर्ज करावेत.
अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यातील अभिजित चालला इंग्लंड ला
नोंदणी व अर्ज करतांना काही तांत्रिक अडचण उद्भभवल्यास उमेदवारांनी संबंधित आस्थापनांशी किंवा संबंधित मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्रांशी संपर्क साधवा. योजनेची तसेच अर्ज करण्याची सर्वंकष माहिती https:// maps.dvet.gov.in या पोर्टलवर देण्यात आली आहे, असे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने कळविले आहे.