mundan andolan सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावर 8 महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, यामुळे राज्यातील शिवप्रेमींनी आपला संताप व्यक्त केला.
अवश्य वाचा : चंद्रपूर शहरात आला बिबट्या
Mundan andolan महायुती सरकारने कमिशन खोरीच्या नादात भ्रष्टाचार करीत पुतळा उभारला, असा आरोप राज्यातून विविध स्तरातून सरकारवर झाला, राज्यात सरकार विरुद्ध अनेक राजकीय, सामाजिक व शिव प्रेमींनी आंदोलन पुकारले, 4 सप्टेंबर रोजी चंद्रपुरातील शिव प्रेमी जनतेने भव्य निषेध मोर्चा काढला.
उर्जानगर-दुर्गापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने महायुती सरकार विरोधात युवकांनी मुंडन आंदोलन करीत निषेध केला. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहे, त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे, या घटनेत जे कुणी दोषी आहे त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी याकरिता आम्ही युवकांनी आज मुंडन आंदोलन केले अशी प्रतिक्रिया दिली.
यावेळी सदिंप बिसेन , सागर धनकसार, नामन पवार, धिरज दुर्योधन, नागेश कडुकर,अंकित वाघमारे मनोज मगांम, राजा शेख,स्वपनिल खांडेकर अमोल दुर्योधन,पीयुष चादेंकर, मनोज इटकर,व असख्य शिवभक्त उपस्थित होते.