babupeth railway मागील अनेक वर्षांपासून बाबूपेठ रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे, दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर काम पूर्णत्वास येत असून आता यामध्ये नवी अडचण समोर आली आहे.
babupeth railway आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे बाबूपेठ उड्डाण पुलाचे काम गतीने पुढे जात आहे. आता यात रेल्वे विभाग, महानगरपालिका, महावितरण कंपनी, एमएमआरडी, आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या सर्व विभागांनी उत्तम काम सुरू केले आहे. मात्र आता या सर्व विभागांनी आपसात समन्वय साधून उर्वरित कामे तात्काळ पूर्ण करावीत,” असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले.
Babupeth railway चंद्रपूर महानगरपालिका कार्यालयात सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकारी यांना सदर निर्देश दिले. बैठकीला महानगरपालिका आयुक्त विपिन पालिवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, शहर अभियंता विजय बोरिकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश तांडले, उपविभागीय अभियंता अंबुले, शाखा अभियंता जावडे, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता वसंत हेडाऊ, सहायक अभियंता साहिल टाके आदी उपस्थित होते.
अवश्य वाचा : महिला अत्याचार विरोधात कँडल मार्च
आमदार किशोर जोरगेवार यांनी 5 कोटी 90 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यानंतर बाबूपेठ रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाला गती आली आहे. सर्व संबंधित विभाग उत्तम काम करत असून पुलाची रंगरंगोटी, लाईट पोलची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामेही जलद पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या.
अडचण काय?
बागला चौकात असलेली मनपाची एलईडी स्क्रीन, झाडे, आणि लाईन पोलमुळे अडचण निर्माण होत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर, सदर इलेक्ट्रिक पोल चार दिवसात हटविण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच, मनपाची एलईडी स्क्रीन तात्काळ हटविण्याच्या सूचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या. पुलाच्या दोन्ही बाजूंना सुंदर सौंदर्यीकरण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. “सर्व विभागांनी समन्वय साधून काम केल्यास हे काम नियोजित वेळेत आपण पूर्ण करू,” असेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले.