Tiger attack (गुरू गुरनुले) चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात वाघाचा धुमाकूळ सुरूच आहे, आज पुन्हा एका गुराख्यावर हल्ला करीत वाघाने ठार केले, मागील 2 वर्षातील ही 23 वि घटना आहे.
Tiger attack बैल चराईसाठी घेवुन गेलेल्या गुराख्यावर दबा धरुन बसलेल्या वाघाने हल्ला केल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना सावली वनविभागाच्या राजोली क्षेत्रातील मरेगांव मुल येथील सर्व्हे नं. १११ च्या बाजुला असलेल्या गुरुदास कवडु वाकडे यांच्या शेतात मंगळवारी दुपारी १ वाजता दरम्यान घडली. वासुदेव झिवरु पेंदोर वय (६०) वर्षे रा. मरेगांव असे वाघाच्या हल्लात ठार झालेल्या गुराख्याचे नांव आहे.
मूल तालुक्यातील मौजा मरेगांव एम.आय.डी.सी. येथील वासुदेव झिवरु पेंदोर वय ६० वर्षे हे गुरे घेवुन चराईसाठी सावली वनविभागाच्या राजोली क्षेत्रातील मरेगांव येथील सर्व्हे नं. १११ च्या बाजुला असलेल्या शेतकरी गुरुदास कवडु वाकडे यांच्या शेतात नेले होते. चराई करीत असताना दरम्यान बाजुला असलेल्या झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करुन ठार केले. सोबत असलेल्या इतर गुराख्यांनी सदर घटनेची माहिती गावकऱ्यांना व वनविभागाला दिली.
अवश्य वाचा : तान्हा पोळ्याला महागाईचे ग्रहण
सावली येथील वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी विनोद धुर्वे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल होवुन पंचनामा केला सावली आणि मूल पोलीस स्टेशनचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. (Tiger attack) व मृतदेह शवविच्येदन करण्यासाठी मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
सावली वनविभागाच्या वतीने वाघाच्या हल्यात ठार झालेल्या वासुदेव पेंदोर यांच्या कुटुंबियांना तात्काळ २५ हजार रुपयाची आर्थिक मदत करण्यात आली. मुल तालुक्यात वाघाच्या हल्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने शेतकरी,गुराखी व गावकरी भयभीत झाले असून अजूनही वनविभाग व शासन यावर काहीही उपाय योजना केल्याचे दिसत नाही.अशी ओरड शेतकरी बांधवांनी केली आहे. अशीच अवस्था शासनाची राहिली तर मात्र मुल व सावली तालुक्यातील शेतकऱ्यांना स्वतःची शेती करणे सोडावे लागेल अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे.
वनविभागाच्या वतीने तातडीची मदत
वासुदेव झींगरु पेंदोर वय ६० वर्षं राहनार मरेगाव , तालुका मूल याला गुरे चारत असतांना गुरुदास वाकडे यांचे शेताच्या बाजुला असलेल्या नाल्याजवळ वाघाने हल्ला करून ठार केले.माहीती मिळताच घटणास्थळी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री विनोद धुर्वे, क्षेत्र सहाय्यक वाकडोत, वनरक्षक धनविजय, वनरक्षक गुरनुले, वनरक्षक आखाडे, वनरक्षक बोनलवार, वनरक्षक नागोसे हे त्वरित हजर होऊन घटणास्थळाचा पंचनामा केला व मृतकाला शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय मूल येथे पाठविण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी सावली श्री विनोद धुर्वे यांचे हस्ते मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत म्हणून २५ हजार रुपये रोख देण्यात आले यावेळी संदिप भाऊ कारमवार, उमेशसिंह झिरे, मरेगाव चे पोलीस पाटील व गावकरी उपस्थित होते.