Shiv premi सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमी नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण होते. या घटनेचा राज्यात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी निषेध नोंदविला.
Shiv premi आज 4 सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून राजकीय, सामाजिक संघटना यांनी एकत्र येत भव्य मोर्चा काढला, मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी तात्काळ या घटनेची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी मोर्च्यात करण्यात आली.
अवश्य वाचा : पूर रेषेच्या आत बांधकाम करणार तर गुन्हे दाखल होणार
हजारो शिवप्रेमी यांनी सदर मोर्च्यात महायुती सरकारचा निषेध नोंदविला, महायुती सरकारने पुतळा उभारणीमध्ये भ्रष्टाचार केला असा आरोप यावेळी करण्यात आला.
शिवाजी महाराज चौकातून निघालेला हा मोर्चा शहराचे भ्रमण करीत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहचला, महायुती सरकारचा निषेध म्हणून शिव प्रेमींनी काळा पोशाख परिधान केला होता.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे म्हणाले की भ्रष्टाचार करीत महायुती सरकारने हा पुतळा उभारला, आणि केवळ 8 महिन्यातच पुतळा कोसळला, याचा आम्ही निषेध करतो भविष्यात महापुरुषांचा अवमान होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. कमिशन खोरी मुळे छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला असा आरोप गिर्हे यांनी यावेळी केला. आयोजित निषेध मोर्च्यात हजारो शिवप्रेमी उपस्थित होते.