chandrapur police माझ्या मुलांकडून पोलीस नेहमी पैसे घ्यायचे, त्याला मारहाण करायचे पोलिसांच्या त्रासामुळे माझ्या मुलाने आत्महत्या केली असा खळबळजनक आरोप 32 वर्षीय पुरुषोत्तम सहारे यांच्या कुटुंबीयांनी 26 सप्टेंबर ला केला आहे.
Chandrapur police 1 जुलै 2024 रोजी रोशन पाटील यांचा मृतदेह लोढीया हॉस्पिटल जवळ आढळला होता, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला, आणि तपास सुरू केला, मृतक हा बागला चौक येथे राहणारे 32 वर्षीय पुरुषोत्तम सहारे यांचे मित्र असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, पोलिसांनी पुरुषोत्तम सहारे यांना याबाबत विचारपूस केली. पुरुषोत्तम सोबत या प्रकरणी पुन्हा 3 जणांचे नाव आहे, 3 पैकी एकाने आधीच आत्महत्या केली अशी माहिती आहे. तर 25 सप्टेंबर ला पुरुषोत्तम यांनी राहत्या घरी पाळण्याच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या केली.
अवश्य वाचा : आचारसंहितेचा भंग होणार नाही याबाबत दक्षता घ्या – जिल्हाधिकारी विनय गौडा
मागील 2 महिन्यापासून पुरुषोत्तम ला शहर पोलीस तपासाच्या नावावर त्रास द्यायचे, तुझे प्रकरण मॅनेज करतो म्हणून आर्थिक देवाणघेवाण सुद्धा करायचे, अनेकदा पोलिसांनी पोलीस स्टेशनमधील कॅमेऱ्याच्या आड पैसे घेतले असा आरोप सहारे कुटुंबीयांनी लावला आहे. Chandrapur police
25 सप्टेंबर ला पुरुषोत्तम सहारे यांना पोलिसांनी तपास कामी ठाण्यात बोलावले, त्यावेळी पुरुषोत्तम यांनी आई व पत्नीला 5-5 हजार मागितले, पुरुषोत्तम पोलीस स्टेशनमध्ये गेला, त्यानंतर तो जेवायला घरी आला, ज्यावेळी तो घरी आला तेव्हा तो मानसिकरित्या अस्वस्थ होता, मला पोलीस खूप त्रास देत आहे, मला आजही मारहाण केली व तुला जैलात टाकतो अशी धमकी दिली, असे त्याने आपल्या पत्नीजवळ सांगितले, दुपारी 1 वाजताच्या सुमारास लहान मुलींसाठी घरात लावलेल्या पाळण्याच्या दोरीने पुरुषोत्तम ने गळफास घेत आत्महत्या केली.
गळफास लावलेल्या स्थितीत पुरुषोत्तम आढळल्याने पत्नी ने हंबरडा फोडला, त्याला तात्काळ सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी पुरुषोत्तम ला मृत घोषित केले, माझ्या मुलाचा मृत्यू हा पोलिसांच्या छळामुळे झाला असा आरोप पत्नी, आई-वडील यांनी केला. Chandrapur police
मागील 2 महिन्यापासून तपासाच्या नावाखाली पुरुषोत्तम ला पोलिसांद्वारे मारहाण करीत पैसे उकळण्याचा प्रताप पोलिसांनी सुरू केला असा आरोपही यावेळी सहारे कुटुंबाने केला.
26 सप्टेंबर रोजी पुरुषोत्तम च्या कुटुंबाने जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेत न्यायाची मागणी केली, पोलीस अधीक्षकांनी चौकशीचे आश्वासन दिले अशी माहिती हौसलाल सहारे यांनी दिली.
पोलीस काय म्हणतात?
रोशन पाटील यांचा मृत्यू नेमका कश्याने झाला? त्याबाबत पुरुषोत्तम दोषी होता का? नेमका घटनाक्रम काय आहे? पुरुषोत्तम सोबत असलेले ते तिघेजण कोण? त्यामध्ये सुद्धा एकाने आत्महत्या केली त्याचे नाव काय? याबाबत माहिती घेण्यासाठी पोलिसांना सम्पर्क साधला मात्र पोलीस निरीक्षक एकुरके यांनी मोबाईल वर कॉल उचलण्याची तसदी सुद्धा घेतली नाही, तपास अधिकारी नंदूरकर यांना सुद्धा विचारणा केली असता सविस्तर माहिती पोलीस निरीक्षक मॅडम यांना विचारा असे सांगितले.
पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांना सुद्धा सम्पर्क साधला असता त्यांचा मोबाईल आऊट ऑफ कव्हरेज होता.
पोलिसांच्या या माहिती न सांगण्याच्या प्रकाराची वर्तणूक खूप काही सांगत आहे असे यावरून स्पष्ट होत आहे.
सहारे कुटुंबाने पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांना न्याय व पोलीस उपनिरीक्षक नंदूरकर व सहायक पोलिस निरीक्षक (नाव गुलदस्त्यात) यांना निलंबित करावे अशी मागणी केली आहे. Chandrapur police
येणाऱ्या काळात पुरुषोत्तम ला न्याय मिळणार काय? यावर सध्यातरी प्रश्नचिन्ह आहे. पोलिसांनी प्रामाणिक प्रयत्न व चौकशी करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे, नाहीतर श्रीमंतांना एक आणि गरिबांना एक न्याय अशी व्याख्या खरी ठरू नये म्हणजे झालं.