shocking chandrapur आई बाबा सॉरी, मला अभ्यासाचे खूप टेन्शन आहे, या आशयाची चिठ्ठी लिहत 17 वर्षीय विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास घेत आत्महत्या केली.
Shocking chandrapur 11 सप्टेंबर रोजी सदर बाब उघडकीस आली, यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील 17 वर्षीय प्रांजली हनुमंत राजूरकर असे आत्महत्या केलेल्या मृत मुलीचे नाव आहे.
वाचा
जिल्हा क्रीडा संकुल जवळील प्रा. विजय बदखल यांचे इन्स्पायर इन्स्टिट्यूट आहे, नीट आणि mh – cet, अभियांत्रिकी शिक्षणासाठी आवश्यक पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी शेकडो विद्यार्थी या कोचिंग सेंटरमध्ये शिक्षण घेतात. या कोचिंग सेंटर मध्ये निवासी वसतिगृहाची सुद्धा व्यवस्था आहे.
अवश्य वाचा – चंद्रपूर जिल्ह्यात धक्कादायक घटना, विजेच्या धक्क्याने चौघांचा मृत्यू
आत्महत्येपूर्वी काय घडलं?
10 सप्टेंबर रोजी प्रांजली हि मामाच्या घरी गेली होती, त्यादिवशी सायंकाळी ती वसतिगृहात परतली, प्रांजली ला थकवा जाणवित असल्याने मी उद्या क्लास मध्ये येऊ शकणार नाही असे तिने मैत्रिणींना सांगितले होते. 11 सप्टेंबर रोजी ती क्लास मध्ये गेली नाही, सायंकाळ झाली तरी प्रांजली रूम च्या बाहेर आली नाही, प्रांजली च्या मैत्रिणींना याबाबत संशय येताच त्यांनी तात्काळ याची माहिती वसतिगृह कर्मचाऱ्यांना दिली, कर्मचारी वसतिगृहात आले त्यांनी दरवाजा ठोठावला मात्र काही प्रतिसाद मिळाला नसल्यानं त्यांनी दरवाजा तोडला.
प्रांजली गळफास लागल्याच्या अवस्थेत रूम मध्ये आढळली. मृत्यूपूर्वी प्रांजली ने आई बाबा च्या नावाने चिठ्ठी लिहली होती, ज्यामध्ये आई-बाबा सॉरी मला अभ्यासाचे खूप टेन्शन आले आहे, त्यामुळे मी या जगाचा निरोप घेत आहे.
इन्स्पायर व्यवस्थापनाने याबाबत रामनगर पोलिसांना माहिती दिली, पोलीस घटनास्थळी दाखल झाले, पंचनामा करीत मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आला.