shocking news ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपुर येथे शेतात काम करीत असताना विजेचा धक्का लागून शेतकरी व शेतमजूर असा 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Shocking news – ब्रम्हपुरी तालुक्यातील गणेशपूर जवळील रूद्रापूर बीट कळमगाव शेतशिवारात काम करीत असलेल्या शेतमजूरांचा जीवंत विद्युत तारांशी संपर्क आल्यामुळे या घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज दि.११ सप्टेंबर २०२४ला सकाळी १० वाजता दरम्यान घडली. यातील एक शेतमजूर गंभीर जखमी असून तो रूग्णालयात भरती आहे.
अवश्य वाचा : खासदार मॅडम असं वागणं बरं न्हवं – भूषण फुसे
प्राप्त माहितीनुसार, ब्रम्हपुरी तालुक्यातील गणेशपूर येथील प्रकाश राऊत वय ४०, युवराज डोंगरे वय ५५, नानाजी राऊत वय ५०, सचिन नन्नावरे, किसन ढोरे, विनोद वसाके व पुंडलीक मानकर वय ६५ राह. चिचखेडा हे सर्वजण गावातील प्रकाश राऊत, नानाजी राऊत व भाष्कर राऊत यांच्या रूद्रापूर बिट कळमगाव येथील शेतशिवारात वन्य प्राण्यांपासून बचाव करण्याकरीता तार लावण्याच्या कामा करीता गेले होते. चौघांनी आधी शेतात खतपाणी टाकले व त्यानंतर जनावरांपासून शेत पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी शेतात फेंसिंग चे काम सुरू केले, तार लावत असताना अचानक त्या तारांमध्ये विजेचा प्रवाह सुरू झाल्याने चौघेही जागीच ठार झाले. विशेष बाब म्हणजे सदर फेंसिंग ही सौर ऊर्जेची नव्हती.
Contents
प्रकाश राऊत वय ४०, युवराज डोंगरे वय ५५, नानाजी राऊत वय ५० व 65 वर्षीय पुंडलिक मानकर या चौघांचा जागीच मृत्यु झाला. तर या घटनेत सचिन नन्नावरे हा गंभीर जखमी असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ब्रम्हपुरी उपजिल्हा रूग्णालयात पाठविले असून पुढील तपास ब्रह्मपुरी पोलिस करीत आहेत.