special activities चंद्रपूर जिल्ह्यातील महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपक्रमांचा आप चा प्रस्ताव
special activities चंद्रपूर जिल्ह्यात वाढत असलेल्या महिला व मुलीच्या अत्याचार प्रकरणबाबत आम आदमी पक्षाच्या वतीने पोलीस विभागाला महिला व मुलींच्या सुरक्षेबाबत विविध उपक्रमांचा प्रस्ताव पोलीस विभागाला सादर केला आहे.
अवश्य वाचा : त्या 4 शेतकऱ्यांचा मृत्यू असा झाला, महावितरण ने सांगितले कारण
आम आदमी पक्षाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील अतिरिक्त पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांना एक महत्त्वपूर्ण निवेदन सादर केले आहे. या निवेदनात, त्यांनी जिल्ह्यातील महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेसाठी काही ठोस उपाययोजना सुचवल्या आहेत. (Special activities)
राईकवार यांनी जिल्ह्यात महिला विद्यार्थींच्या आत्महत्या, अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगच्या घटनांमध्ये होत असलेली चिंताजनक वाढ निदर्शनास आणून दिली. त्यांनी या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली.
महिला सुरक्षा
राईकवार यांनी खालील मुद्दे मांडले:
विशेष महिला पोलीस पथकाची स्थापना:
शैक्षणिक संस्था आणि कार्यस्थळांवर जाऊन महिला व मुलींशी संवाद साधण्यासाठी.
महिलांचा विश्वास संपादन करणे आणि त्यांना सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी.
व्यापक जनजागृती मोहीम:
महिलांच्या अधिकार, सुरक्षा उपाय आणि मदतीच्या मार्गांबद्दल माहिती देण्यासाठी.
आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्य जागृती कार्यक्रमांवर विशेष भर.
गोपनीय सल्ला सेवा:
मानसिक तणाव, ब्लॅकमेलिंग किंवा छळाला सामोरे जाणाऱ्या महिला व मुलींसाठी.
२४x७ हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देणे.
त्वरित प्रतिसाद पथक:
आणीबाणीच्या परिस्थितीत तात्काळ कारवाई करण्यासाठी.
अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगच्या तक्रारींवर तातडीने कारवाई. (Special activities)
नियमित पाठपुरावा आणि मूल्यमापन:
या उपक्रमांच्या प्रभावाचे मूल्यमापन आणि आवश्यक सुधारणा करण्यासाठी.
व्हाट्सअॅप गटाची निर्मिती:
पोलीस आणि नागरिकांमध्ये थेट संवाद साधण्यासाठी.
सुरक्षा टिप्स आणि महत्त्वाची माहिती शेअर करण्यासाठी.
खाजगी संस्था आणि व्यापारी संघटनांमध्ये महिला सुरक्षा समिती:
खाजगी इन्स्टिट्यूट्स आणि व्यापारी संस्थांमध्ये महिला सुरक्षा समित्यांची स्थापना करण्यासाठी प्रोत्साहन.
शैक्षणिक संस्थांमध्ये विशेष मार्गदर्शन कक्ष स्थापन करणे.
राईकवार यांनी म्हटले की, “चंद्रपूर जिल्ह्यातील महिला आणि मुलींविरुद्धच्या गुन्ह्यांचे वाढते प्रमाण, विशेषतः महिला विद्यार्थींच्या आत्महत्या, अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगच्या घटना हे अत्यंत चिंताजनक आहे. आमच्या या सूचना पोलीस प्रशासनाने गांभीर्याने घ्याव्यात आणि त्वरित अंमलबजावणी करावी अशी आमची अपेक्षा आहे.”
त्यांनी पुढे सांगितले, “या उपाययोजनांमुळे महिला आणि मुलींच्या सुरक्षेत लक्षणीय सुधारणा होईल, त्यांच्यावरील अत्याचार कमी होतील आणि आत्महत्येच्या घटना रोखण्यास मदत होईल असा आमचा विश्वास आहे.”
अतिरिक्त पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांनी या निवेदनाचा स्वीकार केला असून, त्यांनी लवकरच खाजगी संस्था आणि व्यापारी संघटनांमध्ये महिला सुरक्षा कार्यक्रम घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचबरोबर त्यांनी या गंभीर समस्यांवर लक्ष केंद्रित करून कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
निवेदन सादर करताना खालील पदाधिकारी उपस्थित होते:
मयूर राईकवार, जिल्हाध्यक्ष, राजकुमार नगराले, जिल्हा सचिव, प्रशांत सिदुरकर, जिल्हा सचिव, राजू कूड़े, युवा जिल्हाध्यक्ष, कुणाल शेट्टे, जिल्हा पदाधिकारी, योगेश गोखरे, शहर अध्यक्ष, संघम सागोरे, वाहतूक जिल्हाध्यक्ष
एड. तबस्सुम शेख, महिला अध्यक्ष, आदित्य नंदनवार, युवा सचिव, अनूप तेलतुंबड़े, युवा उपाध्यक्ष,आम आदमी पक्ष पोलीस प्रशासनासोबत सहकार्य करून या उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.