terrible fire : भीषण आगीत 5 दुकाने खाक

terrible fire (गुरू गुरनुले) मूल येथे शनिवारी मध्यरात्री 3.30 वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत सुमारे 5 ते 6सुमारे दुकाने जळून खाक झाली. सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आली. मात्र, प्लास्टिक कचरा आग धुमसत असल्याने सकाळी 7 वाजेपर्यंत आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्याचे काम सुरूच होते.

अवश्य वाचा : गणपती बघायला गेला आणि 13 वर्षीय मुलगा बेपत्ता झाला


Terrible fire सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मूल ताडाळा रस्त्यावर गणपती मंदीर परिसरात शनिवारी मध्यरात्री 3.30वाजण्याच्या सुमारास कापड दुकान सेल च्या दुकानाला आग लागली.

कांद्या वरील 20 टक्के निर्यात शुल्क माफ

4 वाजता अग्निशामक दलाला कळविण्यात आले. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. संपूर्ण परिसर आगीने वेढला गेला होता. आगीची भीषणता पाहता अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी बोलावून घेतले. मात्र, तरीही आग आटोक्यात येत नसल्याने सावली येथील अग्रिशामक दलाच्या गाडीला बोलविण्यात आले. आग धुमसत असल्याने असल्याने सहा वाजेपर्यंत आगीवर पूर्ण नियंत्रण मिळविण्याचे काम सुरूच होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!