Terror of tigers वनविभागाने तातडीने वाघांचा बंदोबस्त करावा, गुरांना चराईसाठी संरक्षण द्या अन्यथा वनविभागासमोर तीव्र आंदोलन करू असा इशारा कॉंग्रेसचे जेष्ठ नेते, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांनी दिला
Terror of tigers – (गुरू गुरनुले) आज मरेगांव येथे वाघाच्या हल्यात एक गुराखी आज ठार झाला. या पार्श्वभूमीवर रावत यांनी हा इशारा दिला.
चिचाळा, ताडाळा, जानाळा, मरेगांव अशा एकापाठोपाठ एक गावात गुराख्यांवर वाघानी हल्ले करून ठार केले. यामुळे या भागातील नागरीकांत प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. लोक जीवाच्या भितीने आपले दैनदिन कामेही करणे बंद केले आहे. शेतकरी शेतात जाण्यांस तर, गुराखी गुरे चारण्यास घेवून जाण्यास घाबरत आहे. यामुळे ग्रामिण भागातील अर्थव्यवस्थाच धोक्यात आली आहे.
अवश्य वाचा : भाजप आमदार नितेश राणे यांना अटक करा
वनविभागाने वाघाचे बंदोबस्त न केल्यांने, अनेक शेतकरी, आपल्या शेतीत पीके न घेता, शेत पडीत ठेवत आहे. यामुळे या शेतकर्यांची मोठी नुकसान होत आहे.
वनविभागाने या शेतकर्यांना भरपायी द्यावी, गुरांना चराईसाठी निश्चित जागा उपलब्ध करून द्यावी, चारा उपलब्ध करून द्यावा, वाघांचा बंदोबस्त करावा, शासनाने वाघ मारण्यांची तातडीने परवाणगी द्यावी अशी मागणी संतोष रावत यांनी केली आहे.
वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करून ग्रामिणांना दिलासा न दिल्यास कॉंग्रेसच्या वतीने उपनसंरक्षक कार्यालयावर धडक मोर्चा नेण्यात येईल असा इशारा श्री. रावत यांनी दिला आहे.