Wild animals काँग्रेस नेत्या व भूमिपुत्र ब्रिगेड च्या मार्गदर्शिका डॉ. अभिलाषाताई गावतूरे यांच्या नेतृत्वात एक प्रतिनिधिक शिष्टमंडळ वन विभागाचे प्रधान सचिव श्री. बी वेणुगोपाल रेड्डी यांची वन अकॅडमी चंद्रपूर येथे भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये डॉ. अभिलाषा गावतूरे समवेत भादूर्णी, बेंबाल ,चिंचोली, केळझर, चिचाळा, मरेगाव, जानाला, बेंबाळ, बोरचंदली गावातील बहुसंख्य नागरिकांचा समावेश होता.
जिल्ह्यातील विशेषतः बल्लारपूर विधानसभेतील जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. खालील विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. Wild animals
बिबट्याने केली 7 वर्षीय मुलाची शिकार
- वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना सरकारी नोकरी देणे.
- वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर मोबदला म्हणून मिळणाऱ्या पंचवीस लाख रक्कम त्वरित देण्यात यावी व रकमेत वाढ करण्यात यावी.
- गाय, बैल, शेळी, मेंढी, म्हैस, बकरी च्या चराईसाठी गावनिहाय चराई कुरण करून मोफत चराई करण्याची परवानगी द्यावी.
- वाघ, बिबट, अस्वल अशा हिंस्र प्राणी यांची निश्चित आकडेवारी शोधून चंद्रपूर जिल्ह्यातील वन क्षेत्र तुलनेत संख्या जास्त झाल्यास अन्यत्र हलवण्याची कारवाई करावी.
- सर्व हिंस्र पशूंना कॉलर आयडी लावून त्यांच्या हालचालीवर देखरेख ठेवून ते गावाजवळ आल्यास त्यासंबंधी सूचना गावकऱ्यांना करणे व याबाबत यंत्रणा विकसित करणे. (Wild animals)
- वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना तात्काळ दवाखान्यात नेण्यासाठी रुग्णवाहिका वन विभागात द्वारे उपलब्ध करून देणे व नामांकित खाजगी रुग्णालय यांचे नामांकन करून रुग्णालय उपलब्ध करून देणे जेणेकरून जखमी व्यक्तीस दर्जेदार उपचार मिळेल.
- ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सफारी चे संपूर्ण व्यवस्थापन स्थानिक गावकऱ्यांच्या हाती देणे व कम्युनिटी सफारी सुरू करणे त्याचे उत्पन्न स्थानिक गावकऱ्यांना मिळेल.
- सराई कुरण बाबत वारंवार पाठपुराटा करून देखील चराई कुरण निर्माण न करणाऱ्या वन अधिकाऱ्याचा आढावा घेऊन निलंबनाची कारवाई करावी.
- सोलर झटका मशीन वा निकृष्ट दर्जाचे वाटप होत असल्याने सदर भ्रष्टाचाराची उच्च चौकशी करून व संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी. Wild animals
- बॉटनिकल गार्डन वन उद्यान व अकॅडमी यामध्ये निर्माण केलेले हॉटेल पब्लिक रेस्टॉरंट व व अन्य कामांमध्ये मोठ्या प्रमाणात कमिशन आणि लाचखोरी होत असल्याने याची उच्चस्तरीय समिती गठीत करून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी.
- वन विभागाच्या सर्व प्रकल्पांचे सोशल ऑडिट करून रिपोर्ट सार्वजनिक करावी. सोशल ऑडिट कमेटी मध्ये सर्व स्टेकहोल्डर्स चा समावेश असावा.
- वन हक्क कायदा 2006 मध्ये संशोधन करून वन जमिनी वरती शेती व घरगुती वापरासाठी 2024 पर्यंत झालेले अतिक्रमण कायदा करून वन हक्काने पट्टे वाटप करण्यात यावे.
- वन हक्क कायदा 2006 मध्ये गैर आदिवासी समाजाच्या तीन पिढ्यांची अट रद्द करण्यात यावी.
या मागण्यांना घेऊन प्रधान सचिव वन विभाग व वनबल प्रमुख व वन विभागातील विशिष्ट अधिकारी यांच्यासोबत भेट घेऊन चर्चा केली. सर्व मागण्या योग्य असल्याचे प्रधान सचिव यांनी मान्य केले व सदर समस्या त्वरित निकाली काढण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
चंद्रपूर जिल्ह्यात प्रथमच वन विभाग अधिकाऱ्याची नियोजन शून्य व कमिशन कारभार याविषयी वन सचिवाशी झालेल्या चर्चेमुळे वन अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. शेतकरी, गुराखी व सामान्य नागरिक यांच्या प्रश्नाला काँग्रेस नेत्या डॉ. अभिलाषाताई गावतुरे यांनी वाचा फोडली. या महत्वपूर्ण मागण्याबाबत राजकीय दबाव व राजकीय हस्तक्षेप झाला नाही तर चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ, बिबट, अस्वल या हिंस्र प्राण्याचे बंदोबस्त तसेच बैल, गाय मेंढी, शेळी, बकरी म्हैस यांच्या चराईचा प्रश्न व वन विभागातील कमिशन खोरी, भ्रष्टाचार या समस्या 100% सुटतील असा आशावाद डॉ. अभिलाषाताई गावतुरे यांनी व्यक्त केला व यास समस्या करिता राजकीय पक्ष राजकारण यांच्या सीमा ओलांडून जमिनीचे जन आंदोलन करण्याचा आव्हान याप्रसंगी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला केले.
या समस्यांवर होणाऱ्या प्रत्येक जन आंदोलनात सर्वात पुढे राहण्याचा निश्चय याप्रसंगी केला.