Tiger attack news : वाघाने केली गुराख्याची शिकार

tiger attack news गुरू गुरनुले मूल : तालुक्यातील काटवन जंगलातील कक्ष क्र. ७५६ मध्ये शेळ्या चारण्या करीता गेलेल्या चिचोली येथील देवाजी वारलु राऊत (५०) ह्याचेवर हल्ला करून नरभक्षी वाघाने त्याचा बळी घेतल्याची घटना आज संध्याकाळी ४.३० वा. चे दरम्यान घडली. घटनेची माहीती होताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृतक देवाजी राऊत यांचे पार्थीव लागलीच उपजिल्हा रूग्णालय मूल येथे शवविच्छेदना करीता पाठविण्यात आले.

अवश्य वाचा : ब्रह्मपुरी विधानसभेत भाजपची दावेदारी

Tiger attack news घटनास्थळी वनपरीक्षेञ अधिकारी राहुल कारेकर, क्षेञ अधिकारी गजानन वरगंटीवार, वनरक्षक परचाके, बुरांडे यांनी भेट देवुन पाहणी करत नरभक्षी पट्टेदार वाघ आहे किंवा बिबट याचा शोध घेण्यासाठी कँमेरे लावण्यात आल्याचे वनपरीक्षेञ अधिकारी कारेकर यांनी सांगीतले. मृतक देवाजी यांच्या कुटूंबाला २० हजार रूपयाची तातडीची मदत देण्यात आली. (Tiger attack news)

मृतकाचे पश्चात पत्नी आणि मूल आहेत. मृतकाचे शव विच्छेदन करुन कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. काटवन परीसरात यापुर्वीही वाघाने हल्ला करून तीन ते चार जणांचा जीव घेतला आहे. त्यामूळे परीसरात दहशत पसरली असून नुकतेच चंद्रपूर येथील वनसंरक्षक वनवृत्त चंद्रपूर यांचेकडे वाघाचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावे अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा कांग्रेस नेते,चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांचे नेतृत्वात निवेदन दिले.त्याच वेळेस वनसंरक्षक डॉ.रामगावकर व विभागीय वनआधिकारी खाडे यांनी यावर आम्ही नक्कीच उपाययोजना करु असे आश्वासन दिले होते. दहा दिवसात पुन्हा घटना घडली असल्याने अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांचे काय.असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. उपजिल्हा रुग्णालयात मृतकाच्या नातेवाईकांनी व नागरिकांनी गर्दी केली होती.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!