chandrapur crime news : चंद्रपूर जिल्ह्यातील ही महिला दहशतीमध्ये, पोलिसांची भूमिका काय?

chandrapur crime news चंद्रपूर जिल्हा वर्ष 2024 पासून गुन्हेगारी क्षेत्रात मोठा झाला, यावर्षी खुनाच्या घटना, गोळीबार अश्या विविध घटनेमुळे जिल्हा प्रकाश झोतात आला आता पुन्हा ते सत्र तसेच सुरूच आहे.

chandrapur crime news चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील नागरी गावात मोठा गुन्हा घडण्याच्या तयारीस असलेली बाब उघडकीस आली आहे, 1 सप्टेंबर ला नागरी गावातील 30 वर्षीय महिला नेहमीप्रमाणे घरी घरकाम करीत होती, सकाळी 11.30 वाजता एक इसम ज्याच्या हातात सत्तुर व चाकू होता त्याने घरचा दरवाजा उघडा असा आरडाओरडा केला, त्यानंतर तो घाणेरड्या शब्दात शिवीगाळ करू लागला, महिला घाबरली, तो इसम म्हणाला की दार उघड आज तुझ्या पतीचा मर्डर करतो, जर तू आडवी आली तर तुला#$%#^ अश्लील शब्दात शिवीगाळ केली.

अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यातील oyo ची चौकशी करा, मनसेचे निवेदन

आरडाओरडा ऐकू आल्यावर शेजाऱ्यांनी त्याठिकाणी गर्दी केली, काहींनी त्या इसमाला समजवण्याचा प्रयत्न केला मात्र तो ऐकण्याचा मनस्थिती मध्ये नव्हता, त्याने महिलेच्या घरातील दरवाजा लाता व दगडाने दार तोडत आत प्रवेश केला, त्याने महिलेच्या गळ्याला सत्तुर लावला, महिलेने आरडाओरडा करीत तिथून पळ काढला, या सर्व प्रकरणाची वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.

डॉक्टरसाठी जनता रस्त्यावर

Chandrapur crime news 36 वर्षीय शंकर रमेश हिवरकर असे त्या आरोपीचे नाव आहे, याबाबत 6 सप्टेंबर रोजी श्रमिक पत्रकार संघात पीडित महिलेने पत्रकार परिषद घेत माहिती दिली. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार झाल्यावर पोलिसांनी आरोपीला अटक केली मात्र 2 दिवसांनी आरोपी हिवरकर पोलीस कोठडी मधून बाहेर आल्यावर पुन्हा त्याने पीडित महिलेचे घर गाठत त्यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिली, 4 सप्टेंबर ला पीडित महिलेने वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली मात्र यंदा पोलिसांनी कारवाई केली नाही असा आरोप पीडित महिलेने पत्रकार परिषदेत आरोप केला.

Chandrapur crime news सदर प्रकरणाबाबत नागरी येथील महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम मोहीम समिती अध्यक्ष विनोद वाटमोडे यांना याबाबत तक्रार केली, सदर आरोपी हिवरकर हा गावात अवैध दारूविक्री चे काम करतो. विशेष बाब म्हणजे 4 सप्टेंबर ला आरोपी शंकर हिवरकर हा पोलीस कोठडीतून बाहेर आल्यावर पीडित महिलेला पुन्हा शिवीगाळ करीत मी आता बाहेर आलो, पोलीस माझे काही बिघडवू शकत नाही, त्यांना मी पैसे दिले आहे, तुझा व तुझ्या पतीचा मर्डर केल्यावर मी जेल मध्ये जाणार अशी धमकी त्याने दिली.

महिला सुरक्षेबाबत जिल्ह्यातील सामाजिक संघटना पुढाकार घेत आहे, पोलीस अधीक्षक असे गुन्हे न घडावे यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहे, मात्र काही अधिकाऱ्यांमुळे असे गुन्हे घडणार अशी शक्यता निर्माण झाली आहे, नागरी येथील पीडित महिला आज दहशती मध्ये आहे, पती कामानिमित्त बाहेर जातात त्यावेळी महिला आपल्या 2 लहान मुलीसोबत घरी एकटी असते.

पोलीस आता पुन्हा काही मोठी घटना व्हायची वाट बघत आहे का? असा प्रश्न यावेळी निर्माण झाला आहे. आता पोलीस याबाबत काय कठोर पाऊल उचलतात हे येणारी वेळ सांगणार.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!