Ayodhya Ram mandir ‘ब्रम्हपूरीचा महाराजा गणेश मंडळाच्या वतीने यंदा गणेशोत्सवात भाविकांना होणार “अयोध्येच्या राम मंदिराचे” दर्शन, गणेशोत्सवात सुप्रसिद्ध गायक सलमान अली, इशीता विश्वकर्मा, सिनेअभिनेत्री उर्मिला कोठारे यांची राहणार उपस्थिती
Ayodhya ram mandir आता अगदी काही दिवसांतच गणपती बाप्पा चे आगमन होणार असून सर्वत्र धामधूम असणार आहे. अशातच संपूर्ण विदर्भात शिक्षणाची पंढरी म्हणून प्रख्यात असलेल्या ब्रम्हपूरी शहरातील गणेशोत्सव देखील तितकाच लोकप्रिय आहे. या शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवाला मोठी परंपरा लाभली असून गणेशोत्सवात मोठा सामाजिक सलोखा देखील बघायला मिळतो.
महत्त्वाचे : महावितरण कार्यालयात तोडफोड, सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे वर गुन्हा दाखल
Ayodhya ram mandir या परंपरेला कायम ठेवत महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपूरीचा महाराजा गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून मागील वर्षीपासून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या ब्रम्हपूरीचा महाराजा या गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यावर्षी देखील मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा होणार असुन यावर्षी या मंडळाच्या वतीने अयोध्या राम मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात येणार असून भाविकांना अयोध्येच्या राम मंदिराचे साक्षात दर्शन होणार आहे. मागील वर्षी या मंडळाच्या वतीने केदारनाथ मंदिराचा देखावा उभारण्यात आला होता. सोबतच गणेशोत्सवात विविध प्रकारचे सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात येणार असून रुपेरी पडद्यावरील कलाकारांची देखील यानिमित्ताने गणेशोत्सवात हजेरी लागणार आहे. हे मात्र विशेष.
Ayodhya ram mandir मंडळाच्या वतीने ७ सप्टेंबर रोजी सायं. ६ वा. गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना होणार आहे. १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वा. आरोग्य व रक्तदान शिबीर, रात्री ८ वा. ‘गांधी कभी मरते नही’ महानाट्य, १३ सप्टेंबर रोजी दु.१ वा. ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, सायं.७ वा. दादा-दादी टॅलेंट शो असुन यावेळी सिनेअभिनेत्री उर्मिला कोठारे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. १३ सप्टेंबर रोजी रात्री ८ वा. डान्स महासंग्राम, १४ सप्टेंबर रोजी दु. १२ वा. कला क्षेत्रातील कलावंतांचा सत्कार, रात्री ८ वा. ‘रामायण’ महानाट्य, १५ सप्टेंबर रोजी सायं. ६ वा. हाऊजी खेळ, १५ सप्टेंबर रोजी रात्री ८ वा. ‘भुक’ नाटक, १६ सप्टेंबर रोजी दु.१२ वा. प्रश्नमंजुषा स्पर्धा, सायं.४ वा. वादविवाद स्पर्धा, रात्री ८ वा. होम मिनिस्टर, १७ सप्टेंबर रोजी रात्री ८ वा. इंडियन आयडॉल विजेता, सुप्रसिद्ध गायक सलमान अली व सारेगामापा विजेती इशीता विश्वकर्मा यांचा लाईव्ह सिंगीग शो व रात्री ११ वा. गोपालकाला राहील. तर १८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वा. पासून ढोलताशांच्या गजरात गणपती बाप्पा चे मिरवणुक व त्यानंतर विसर्जन होणार आहे.
अयोध्येचा राममंदिर विशेष आकर्षण
यंदा ब्रम्हपुरीचा महाराजा गणेश उत्सव मंडळाच्या वतीने अयोध्येचा राम मंदीराची हुबेहूब प्रतिकृती तयार करण्यात आली असून या ठिकाणी बाप्पाच्या दर्शनासाठी आल्यानंतर अयोध्येच्या मंदीराचे साक्षात दर्शन होणार आहे. मंदीरात १५ फुट उंच गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. सोबतच याठिकाणी मिनी बाजार(मेला) यामध्ये विविधांगी झुले, पाळणे, राहणार असुन सांस्कृतिक, सामाजिक, जनजागृतीपर कार्यक्रमांची मोठी मेजवानी भेटणार आहे. त्यामुळे दररोज विदर्भातील विविध जिल्ह्यांतुन हजारोंच्या संख्येने भाविक याठिकाणी उपस्थिती दर्शविणार असल्याचे सांगितले जात आहे.